Friday, July 5, 2024

‘कोण म्हणतं अदा प्राणी प्रेमी नाही?’ पाहा अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडिओ

कमांडो 2’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप साेडणारी अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अदाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहेत. अदाला 60 लाखांहून अधिक चाहते इंस्टाग्रामवर फॉलो करतात. अदाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येताच तुफान व्हायरल होत असतात. अशातच तिचा आणखी एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये अदा छाेट्या हत्तीसाेबत खेळताना दिसत आहे.

अदाच्या व्हिडिओवर चाहत्यांचा लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव
या व्हिडिओमध्ये अदा (Adah Sharma) छाेट्या हत्तीसाेबत खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अदाने ऑरेंज रंगाचा सुंदर स्कर्ट घालून त्यावर निळ्या रंगाचे टाॅप घातले आहे. यासाेबतच अदाने वेनीत गजरा लावला आहे. अदाच्या या लूकवर चाहते फिदा झाले असून तिच्या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर खूप पसंती दिली जात आहे. हा व्हिडिओ अदाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की,”शुद्धबोले ️
हयाती विथ बेबी हाथी #इफयूनाे यूनाे”

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदा शर्मा साऊथ आणि हिंदी दाेन्ही चित्रपटांमध्ये करते काम
अदा शर्मा हिने तिच्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये केली होती. त्यानंतर तिने विक्रम भट्टच्या ‘1920’ या चित्रपटात काम केले त्यावेळी ती अवघ्या 16 वर्षांची होती. नंतर अदाचे हिंदी चित्रपट चालत नसल्याने ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत गेली. आता ती हिंदी आणि साऊथ अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम करते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
विकी काैशल घेताेय मसाजचा आनंद, पाहा व्हायरल व्हिडिओ

मौनी रॉयसाठी ‘ब्रह्मास्त्र’ आहे खूपच खास; ओटीटी स्ट्रीमिंगबद्दल म्हणाली…

हे देखील वाचा