Sunday, June 2, 2024

सीता नवमीच्या दिवशी आदिपुरुषमधील ‘जानकी’चा लूक समोर, अश्रुंमधून वेदना वक्त करणाऱ्या क्रितीने वेधले लक्ष

दिग्दर्शक ओम राऊत याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा ‘आदिपुरुष’ सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. कधी ट्रोलिंगमुळे तर कधी चित्रपटाच्या नवनवीन पोस्टर्समुळे हा सिनेमा सतत प्रसिद्धीमध्ये आहे. प्रभास, कृती सेनन यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचे आतापर्यंत अनेक पोस्टर समोर आले आहेत. या पोस्टरमधून कलाकारांचे लूक देखील प्रेक्षकांना पाहता आले. रामनवमीच्या मुहुर्तावर चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते. त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचा लूक समोर आला आणि सीता नवमीच्या दिवशी ‘आदिपुरुषम’धील सीतामातेचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

आदिपुरुषमधील कृती सेननच्या सीता मातेतील लुकसोबत ‘राम सिया राम’ हा ऑडिओ देखील प्रदर्शित केला गेला आहे. हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनसोबत कृती सेननने सीतेच्या निस्वार्थपणा आणि पवित्रतेचे वर्णन केले आहे. यासोबतच तिने ‘जय सिया राम’ हे सहा वेगवेगळ्या भाषणामध्ये लिहीत ऑडिओ टिझर शेअर केला आहे. या पोस्टरबद्दल सांगायचे झाले तर तिच्या डोळ्यांमधील पाणी, हताशपणा स्पष्ट दिसत आहे. सोबतच तिच्या डोळ्यातील अश्रू देखील पडताना दिसत आहे. तर राम आणि लक्ष्मणच्या रूपातील प्रभास आणि सनी हातात धनुष्य घेऊन उभे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

या ऑडिओ टीझरवर आता नेटकऱ्यांच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली असून, एकाने कमेंट करत लिहिले, “वाटते की हा सिनेमा ब्लॉकबस्टर होणार आहे.”, दुसऱ्याने लिहिले, “ब्लॉक्सबस्टर लोडींग”, अजून एकाने कृतीला प्रश्न विचारले आहे, “मम् ट्रेलर कधी येणार आहे?”, तर अनेकांनी जय श्रीराम लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

आदिपुरुष या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास श्रीराम ही भूमिका, कृती सेनन सीता साकारताना दिसणार आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आणि अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यांनंतर लक्ष्मीकांत यांनी दाखवलेल्या नम्रतेमुळे त्यांनी जिंकले होते लोकांचे मनं

काश्मीर फाइल्सला पुरस्कार न मिळाल्यामुळे नाराज अनुपम खेर यांचा फिल्मफेयर निशाणा म्हणाले, ‘इज्जत महाग गोष्ट…’

 

हे देखील वाचा