Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड आदित्य चोप्रांचा सर्वात मोठा निर्णय; फेटाळली ओटीटी प्लॅटफॉर्मकडून मिळालेली ‘इतक्या’ कोटींची ऑफर

आदित्य चोप्रांचा सर्वात मोठा निर्णय; फेटाळली ओटीटी प्लॅटफॉर्मकडून मिळालेली ‘इतक्या’ कोटींची ऑफर

आदित्य चोप्रा यांची गणना बॉलिवूडच्या दिग्गज चित्रपट निर्मात्यांमध्ये केली जाते. यशराज फिल्म्स हे चित्रपट निर्मितीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. या बॅनरखाली अनेक हिट चित्रपट बनले आहेत. हिंदी चित्रपट जगतातील सर्व मोठे कलाकार यशराज फिल्म्स चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी एका पायावर म्हटले तरी तयार असतात. आदित्य चोप्रा एक हुशार व्यक्ती असून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय अचूक ठरले आहेत. अलीकडेच, आदित्य चोप्रांनी ४०० कोटींची ऑफर नाकारून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

यश राज फिल्म्सचे ४ चित्रपट ‘बंटी और बबली २’, ‘जयेशभाई जोरदार’, ‘शमशेरा’ तयार आहेत. ‘पृथ्वीराज’चे कामही अंतिम टप्प्यात आहे. या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, संजय दत्त सारखे कलाकार आहेत. आदित्य चोप्रा बऱ्याच काळापासून सामान्य स्थितीची वाट पाहत आहेत. जेणेकरून हे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतील.

निर्मात्यांनी १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ या चित्रपटांचे प्रदर्शन रोखले आहे. इतर निर्माते ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करत असताना, आदित्य चोप्रा ओटीटीवर आपले चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मूडमध्ये नाहीत. दुसरीकडे, सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत, त्यांनी त्यांचे चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले आहेत. इतर अनेक दिग्गज निर्मात्यांनीही हे केले आहे. आदित्य चोप्रांनाही ओटीटी प्लॅटफॉर्मवरून सतत ऑफर मिळत आहेत, पण त्यांनी त्या सर्व ऑफर्स नाकारल्या आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आदित्य चोप्रा यांना हे चित्रपट ओटीटीवर थेट प्रदर्शित करण्याच्या बदल्यात एका प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे ४०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. ही एक मोठी रक्कम आहे आणि आदित्य चोप्रा त्याद्वारे खूप नफा कमावू शकले असते. मात्र, आदित्य चोप्रा यांनी ऑफर नाकारण्यास वेळ घेतला नाही. त्यांना त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करायचे आहेत.

त्यांना अशी ऑफर देण्यात आली होती की, जर त्यांना चारही चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करायचे नसतील, तर ओटीटीवर लहान बजेटचे चित्रपट दिले जाऊ शकतात. मात्र, त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. आदित्य चोप्रांसारख्या चित्रपट निर्मात्यांमुळेच चित्रपटगृहे व्यावसायिकांनी आतापर्यंत व्यवसाय चालू ठेवण्याचे धैर्य मिळवले आहे.

त्याचबरोबर आदित्य चोप्रा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या हजारो लोकांच्या लसीकरणासाठी एक योजना देखील सुरू केली होती. ज्यामुळे मुंबईत शूटिंग पुन्हा सुरू करण्यात मदत झाली. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, आदित्य चोप्रा यांनी चित्रपट उद्योगातील हजारो रोजंदारीवरील कामगारांच्या बँक खात्यात पैसे पाठवून थेट मदत केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय

हे देखील वाचा