Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड यामी गौतमने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पतीसोबतच्या फोटोसह लिहले खास कॅप्शन

यामी गौतमने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, पतीसोबतच्या फोटोसह लिहले खास कॅप्शन

सर्व सामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत दिवाळी सणाची तयारी सर्वत्र सुरू आहे. प्रत्येकजण दिवाळीसाठी काय काय नवनवीन गोष्टी करता येतील, हे पाहण्याकडे लक्ष लावून बसलेला आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी देखील प्रत्येकजण उत्सुक आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या जवळच्या व्यक्तींना सर्वजण दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. याचप्रमाणे आता बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुधवारी (३ ऑक्टोबर) तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना छोट्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पतीसोबतचा फोटो शेअर करून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
अभिनेत्री यामी गौतमने इंस्टाग्रामवर तिचा पती आणि चित्रपट निर्माता आदित्य धरसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहेत. फोटोमध्ये आदित्य धर यामी गौतमला मिठी मारत आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे आणि तेही जोडप्याला दिवाळीच्या शुभेच्छा देत ​​आहेत. तिच्या या पोस्टला आतापर्यंत एक लाखांहून अधिक युजर्सने लाईक केले असून, त्यावर प्रतिक्रिया येत आहेत.

फोटोत यामीने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे आणि तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. आदित्य धरने पत्नीला मिठी मारली आहे. त्याने काळ्या रंगाचे जाकीट घातले आहे. ही पोस्ट शेअर करताना यामीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दरवर्षी दिवाळी नवीन आठवणी आणि नवीन सुरुवात घेऊन येते. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला छोटी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे, आरोग्याचे आणि यशाचे जावो!” तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका यूजरने लिहिले की, “तुम्ही दोघे खूप सुंदर दिसता.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “तुमच्या साडीच्या लूकची वाट पाहत आहे.” त्याचवेळी अनेक चाहते तिला आणि तिच्या पतीला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे… एवढं महाग! करवाचौथला यामीने घातलेल्या मंगळसूत्राची किंमत माहितीये का? वाचून सरकेल पायाखालची जमीन

-पती आदित्य धरसह सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाली यामी, लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले जोडपे

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा