Friday, July 5, 2024

‘जो बीवी से करे प्यार, वो मूँछ मुंडवाने से कैसे करे इनकार…’, आदित्य नारायणचा ‘तो’ व्हिडिओ आला चर्चेत

बॉलिवूड गायक आणि प्रसिद्ध होस्ट म्हणजे आदित्य नारायण होय. आदित्य नारायण हा एक लोकप्रिय होस्ट आहे. त्याने अनेक शो होस्ट केले आहेत. प्रेक्षकांना देखील त्याची होस्टिंग खूप आवडते. तसेच तो त्याचे वडील उदित नारायण यांच्याप्रमाणे गायक देखील आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलीयों की रासलीला : रामलीला’ या चित्रपटातील ‘ततड ततड’ या त्याच्या आवाजातील गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. नुकतेच त्याने टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘इंडियन आयडल १२’ हा शो होस्ट केला होता. अलीकडेच या शोचा ग्रँड फिनाले झाला आहे. त्यानंतर तो आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल मालदीवला गेले आहेत. अशातच त्याने त्याच्या पत्नीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या तुफान चर्चेत आला आहे.

आदित्यने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पत्नी त्याची शेविंग करताना दिसत आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आदित्यने लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे. तसेच त्याने डोळ्यांवर चष्मा घातलेला आहे. श्वेताने देखील एक सुंदर ड्रेस घातलेला दिसत आहे. ती आदित्यजवळ जाते आणि शेविंग करते.

आदित्यने त्यांचा हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “जो बीवी से करे प्यार, वो मूछ मुंडवाने से कैसे करे इनकार.” त्यांचा हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. (aditya narayan share a video with his wife)

आदित्यने अनेक चित्रपटात अभिनय देखील केला आहे. त्याने ‘शापित’ या चित्रपटात काम केले आहे . यासोबत त्याने गाणी देखील गेली आहे. एक होस्ट म्हणून आपण त्याला अनेक शोमध्ये पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आदित्यने मागच्या वर्षी २०२० मध्ये त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा