Wednesday, July 3, 2024

आदित्य नारायणने पहिल्यांदा दाखवली मुलीची झलक, वडिलांच्या खांद्यावर झोपलेली दिसली त्विषा

गायक आणि होस्ट आदित्य नारायण नुकतेच वडील झाला आहे. आदित्य आणि श्वेता नुकतेच एका गोड मुलीला जन्म दिला आहे. यावेळी आदित्य त्याच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या मुलीचे नाव काय आहे हे सांगितले आहे. अशातच त्याने त्याच्या मुलीचा पहिल्यांदा फोटो शेअर केला आहे. त्याने त्याच्या मुलीसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने सोशल मीडियापासून अंतर ठेवले आहे याचा त्याने खुलासा केला आहे.

आदित्य नारायणने त्याच्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्विषा हे त्याच्या मुलीचे नाव आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. सोशल मीडियावर शेअर केलाय आताच्या फोटो मध्ये त्विषा आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “ग्रेटफुल, लकी आणि भाग्यशाली वाटत आहे. येणारे काही आठवडे मी माझ्या परी सोबत घालवणार आहे. लवकरच डिजिटल वर्ल्डवर भेटूयात.”

आदित्य नारायणसोबत त्याच्या मुलीला पहिल्यांदा पाहिल्यावर त्याचे चाहते खूप खुश झाले. अनेकजण त्याला शुभेच्छा देत आहेत. अनेक कलाकार देखील त्यांना शुभेच्छा देत आहे. भारती सिंगने या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच मिका सिंगने आदित्यला शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकतेच आदित्यने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन चालू केले होते. यावेळी एका चाहत्याने आदित्यला त्याच्या मुलीचे नाव विचारले होते यावर उत्तर देताना आदित्यने त्विषा नारायण झा असे उत्तर दिले होते. आदित्यने आणि श्वेताने २४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर आदित्यने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली होती.

आदित्यच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आदित्यने होस्टिंगला रामराम ठोकला आहे. त्याने सोशल मीडियावर या गोष्टीची माहिती दिली होती. त्याने लिहिले होते की, “जड अंतःकरणाने मी होस्टिंगला राम राम ठोकला आहे. यामुळे माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली.” अशाप्रकारे त्याने त्याचे मत व्यक्त केले होते.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा