Monday, July 1, 2024

Om | आपल्या भूतकाळातील प्रश्नांची उत्तरं शोधत आलाय ‘तो’, आदित्य रॉय कपूरच्या ‘ओम’चा दमदार ट्रेलर लाँच

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरचा (Aditya Roy Kapur) ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘ओम’चा दमदार ट्रेलर लाँच झाला आहे. चित्रपटातून समोर आलेल्या ट्रेलरमध्ये अभिनेता ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बरीच ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर बघता असे म्हणता येईल की, हा ऍक्शनपॅक एंटरटेनर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर जबरदस्त ऍक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता त्याच्या भूतकाळातील प्रश्नांची उत्तरे शोधताना दिसला. यासोबतच तो वडिलांवरील आरोप चुकीचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसला. ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा देशभक्तीने भरलेली असेल, असे म्हणता येईल. (aditya roy kapoor starrer action thriller film om trailer is out)

चित्रपटाच्या ट्रेलर रिलीझबद्दल माहिती देताना, झी स्टुडिओने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा ट्रेलर व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “झी स्टुडिओसाठी राष्ट्र सर्वात वरचे आहे. ओम: द बॅटल विदिन ट्रेलर आऊट.” आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच धाडसी आणि अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसला आहे.

‘ओम: द बॅटल विदिन’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर आदित्य रॉय कपूर व्यतिरिक्त संजना सांघी (Sanjana Sanghi), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), प्रकाश राज (Prakash Raj) आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले असून झी स्टुडिओज, अहमद खान आणि सायरा खान यांनी निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा