Friday, April 26, 2024

शाळेत असताना बनायचे होते क्रिकेटर, ‘आशिकी 2’ चित्रपटाने आदित्य रॉय कपूरला दिली खरी ओळख

चित्रपटात ज्याला आपण एका रोमँटिक अभिनेत्याच्या रुपात पाहिले आहे, तो म्हणजे आदित्य रॉय कपूर. ‘आशिकी 2‘ या चित्रपटात त्याचा अभिनय पाहून सगळी दुनिया त्याची दीवानी झाली होती. आदित्यबाबत ही गोष्ट अनेकांना माहित नसेल की, त्याचे आजोबा एक चित्रपट निर्माते होते. त्याची आई सॅलोम रॉय कपूर यांनी देखील एकेकाळी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. त्यांनी देब बॅनर्जीसोबत ‘तू ही मेरी जिंदगी’ या चित्रपटात काम केले आहे.

तसेच त्याचे आजोबा रघुपत रॉय कपूर यांनी 1940 मध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. आदित्यला दोन भाऊ आहेत. त्याचा मोठा भाऊ सिद्धार्थ रॉय कपूर यूटीव्ही मोशन पिक्चरचा सीईओ आहे, ज्याने विद्या बालनसोबत लग्न केले आहे. त्याच्या दुसरा भाऊ कुणाल रॉय कपूर हा देखील एक अभिनेता आहे. अभिनयाचा वारसा घेऊन आलेला आदित्य रॉय कपूर बुधवारी (16 नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर या निमित्त जाणून घेऊया त्याच्या बाबत काही खास गोष्टी (Bollywood actor Aditya Roy Kapoor celebrate his birthday, let’s know about him)

आदित्यचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 मध्ये मुंबई येथे झाला. त्याने अभिनयाचा कोणताही कोर्स केला नाही. आदित्य ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेत त्याची आई नाटकांचे दिग्दर्शन करायची. त्याने त्याच्या आईकडूनच अभिनयातील अनेक गोष्टी शिकल्या. शाळेत असताना आदित्यला क्रिकेटर बनायचे होते. परंतु नंतर त्याने त्याचा रस्ता बदलला. मुंबईच्या सेंट जेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर तो टीव्ही चॅनलवर वीजेच्या स्वरूपात काम करू लागला. तिथे अनेक अनेक दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन केले. छोट्या पडद्यावर चांगली लोकप्रियता मिळाल्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला.

आदित्यने त्याच्या करिअरच्या सुरुवात 2009 मध्ये ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्याने अजय देवगण आणि सलमान खानसोबत काम केले होते. यानंतर 2010 मध्ये त्याचा ‘ऍक्शन रीप्ले’ नावाचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटात त्याने अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या मुलाची भूमिका निभावली होती. नंतर ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशनसोबत ‘गुजारिश’ चित्रपटात काम केले. परंतु त्याला या चित्रपटातून जास्त लोकप्रियता मिळाली नाही.

आदित्यसाठी 2013 हे वर्ष लकी ठरले आणि या वर्षातील सर्वात सुपरहिट चित्रपट त्याच्या नावी झाला. तो चित्रपट होता ‘आशिकी 2’. या चित्रपटाने त्याला सर्वत्र ओळख दिली. श्रध्दा कपूर आणि त्याची जोडी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. तसेच चित्रपटातील गाणी देखील खूप गाजली होती.

या चित्रपटानंतर त्याच्या करिअरला वेग आला. त्यानंतर त्याने ‘दावत ए इश्क’, ‘फितूर’, ‘डियर जिंदगी’, :ओके जानू’, ‘कलंक’, ‘सडक 2’, आणि ‘मलंग’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

हेही वाचा-
‘6-7 वर्षांनंतर तो त्याच्या गर्लफ्रेंडला कंटाळतो’, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने लावला आरोप
लग्नाच्या दिवशी सेटवर काम आणि प्रसूतीनंतरही 3 दिवस काम, अशी आहे स्मृती इरानींची संघर्ष गाथा

हे देखील वाचा