Monday, July 1, 2024

आगामी चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आदित्य रॉय कपूर; मुराद खेतानी घेऊन येतायेत ‘थडम’चा हिंदी रिमेक

बॉलिवूडमध्ये डबल रोल असणारे अनेक चित्रपट तयार झाले आहेत. हे सगळे चित्रपट प्रेक्षकांना पसंत देखील पडले आहेत. ‘क्रिश’, ‘जुडवा २’, ‘ओम शांती ओम’, ‘फॅन’ यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दर्शवला आहे. अशातच अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याबाबत अशी माहिती समोर आली आहे की, तो त्याच्या आगामी चित्रपटात डबल रोलमध्ये दिसणार आहे. तमिळमधील सुपरहिट ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘थडम’‌च्या हिंदी रिमेकमध्ये आदित्य रॉय कपूर झळकणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्राचा पत्ता कट झाला आहे. परंतु निर्माते मुराद खेतानी यांनी याबाबत त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या या प्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी सिद्धार्थ मल्होत्रा याला या चित्रपटातून बाहेर काढल्याची बातमी खरी आहे, असे देखील सांगितले आहे. त्यांनी या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ऐवजी आदित्य रॉय कपूरला मुख्य भूमिकेत घेतले आहे.

निर्माते मुराद खेतानी यांनी ट्वीट करून या आगामी प्रोजेक्टबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, “आम्ही आमच्या पुढच्या चित्रपटाच्या घोषणा करताना खूप उत्साहित आहोत. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. आम्ही या चित्रपटात आदित्य रॉय कपूरला मुख्य भूमिकेसाठी निवडले आहे. तो त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा डबल रोलमध्ये दिसणार आहे. हा तमिळ चित्रपट ‘थडम’चा रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वर्धन केतकर करणार आहे. हा चित्रपट टी-सीरिज आणि सिनेवन स्टुडिओज मिळून करणार आहे.” माध्यमातील वृत्तानुसार मुरादने सांगितले होते की, जेव्हा २०१९ मध्ये तमिळ ‘थडक’ प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्यांनी त्या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आदित्य रॉय कपूरने देखील इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून, या प्रोजेक्टबाबत त्याचा आनंद शेअर केला आहे. त्याने हा फोटो शेअर करून लिहिले की, “मी या चित्रपटाचा भाग होऊन खूप आनंदी आहे.” माध्यमातील वृत्तानुसार, त्याने सांगितले की, ‘थडम’ या चित्रपटाची कहाणी खूप चांगली आहे. हा एक इंटरेस्टिंग चित्रपट‌ आहे. त्यामुळे तो खूप प्रभावित झाला आहे. (Aditya Roy Kapoor to do double role in next film Murad khetani to make hindi remake of movie Thadam)

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आदित्य लवकरच कपिल वर्माचा चित्रपट ‘ओम द बॅटल विथ इन’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संजना सांघी दिसणार आहे. यासोबत तो मोहित सुरीच्या ‘मलंग २’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिटत जाती दूर रेषा, अंतराने आखल्या…’, स्पृहा जोशीने ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोसह सादर केली हृदयस्पर्शी कविता

-संजयच्या अफेयरमुळे चिंतित होते वडील सुनील दत्त; एकेकाळी त्यांचे देखील नाव जोडले गेले होते त्या अभिनेत्रीसोबत

-5जी प्रकरण: जुही चावलाने हायकोर्टातून मागे घेतली याचिका, कोर्टाने ठोठावला होता २० लाखांचा दंड

हे देखील वाचा