Monday, July 1, 2024

Om | प्रमोशनवेळी थेट ‘द ग्रेट खली’शी भिडला आदित्य रॉय कपूर, मात्र पुढं जे झालं ते पाहून धराल डोकं

द ग्रेट खलीला वेगळ्या परिचयाची गरज नाही. भारतापासून ते WWE पर्यंत खलीने देशाचे नाव खूप रोशन केले आहे. सध्या खली उर्फ ​​दिलीप सिंग राणा जालंधरमध्ये CWE रेसिंग अकादमी चालवतो. एवढेच नाही, तर खली सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. पण सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुस्तीपटू खली या बॉलिवूड अभिनेत्याशी पुशअप्ससाठी स्पर्धा करताना दिसत आहे. 

खलीने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याशी स्पर्धा केली
खरं तर, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) त्याच्या आगामी चित्रपट ‘ओम’च्या प्रमोशनसाठी CWE अकादमीमध्ये पोहोचला. यादरम्यान आदित्य द ग्रेटला भेटला. चित्रपटाची अभिनेत्री संजना सांघीही (Sanjana Sanghi) आदित्यसोबत दिसली. त्यानंतर खली आणि आदित्य रॉय कपूर यांच्यात पुश अप स्पर्धा झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aditya roy kapur beats the great khali in push ups competition)

या व्हिडिओमध्ये खली आणि आदित्य पुशअप करताना दिसत आहेत. अभिनेत्री संजना सांघी आणि तिथे उपस्थित असलेले लोक त्यांना चियर करत आहेत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की, खली थकतो आणि आदित्य हा सामना जिंकतो. मात्र हा सामना मस्ती म्हणून ठेवण्यात आला असला होता.

इथे पाहा सामन्याचा व्हिडिओ

‘या’ दिवशी रिलीझ होणार चित्रपट
‘आशिकी २’ चित्रपटातून चॉकलेट बॉयची प्रतिमा निर्माण करणारा अभिनेता आदित्य रॉय कपूर हा बॉलिवूडचा नवा हँडसम हंक आहे. आदित्यच्या आगामी ‘ओम’ या चित्रपटात त्याचा ऍक्शन अवतार दिसणार आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट १ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा