Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड भारताचा नागरिक झालेल्या अदनान सामीने ‘या’ कारणामुळे सोडला पाकिस्तान देश

भारताचा नागरिक झालेल्या अदनान सामीने ‘या’ कारणामुळे सोडला पाकिस्तान देश

भारतात गायक अदनान सामी याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याची अनेक गाणी आजही भारतात ऐकली जातात. 2016मध्ये अदनानने पाकिस्तान देशाचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्विकारले. खूप कमी वेळा एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीला भारताचे नागरिकत्व मिळालेले आपण पाहिले आहे. रविवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर (Pakistan vs England) अदनानला अनेकांनी ट्रोल केले. यानंतर या गायकाने थेट ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली व आपण पाकिस्तान देश का सोडला आहे? याचे कारण सांगितले आहे.

अदनान (Adanan Sami) आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, “मला अनेक लोक विचारतात की, माझा पाकिस्तानवर राग का आहे किंवा मी असं का वागतो परंतू मला पाकिस्तानमधील नागरिकांबद्दल अजिबात नाराजी नाही किंवा माझा रागही नाही. जे माझ्याशी चांगले आहे त्यांच्याशी मी देखील चांगलंच वागतो. परंतू मला पाकिस्तानमधील सरकारबद्दल प्रचंड प्रॉब्लेम आहेत. जे मला चांगलं ओळखतात त्यांना माहित आहे की, तिथले सरकार अनेक वर्ष माझ्याबरोबर कसं वागलं. मला पाकिस्तान सोडण्यासाठी हेच मोठं कारण होतं.’

“एक दिवस मी सर्वांसमोर सत्य आणेल. माझं सत्य खूप कमी लोकांना माहित आहे. मी लोकांसमोर माझ्याशी जे तिथलं सरकार वागले ते आणले तर अनेकांना धक्का बसेल.मी अनेक वर्ष या गोष्टी कुणाला सांगितल्या नाहीत. परंतू योग्य वेळ येताच मी सगळ्या गोष्टी सांगेल,”असेही तो आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणाला. (Adnan Sami reveals reason behind leaving Pakistan)

Pakज्या क्षणी अदनानने ही पोस्ट केली त्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेटीझन्स उभे राहिले. यात खासकरुन भारतीय नेटीझन्सचा समावेश जास्त होता. एका चाहत्याने ट्विट करताना म्हटले आहे की, ‘अदनान तु एक वेगळाच माणूस आहे. माझा मित्र, जो तुला भेटला तो तुझ्याबद्दल खूप चांगलं सांगत होता.’ तर, आणखी एक नेटीझन्सने म्हटले आहे की, ‘अदनान, तू भारताची शान आहेस. जगाला तुझ्या संगीताने असंच मंत्रमुग्ध कर.’  याबरोबर अदनानला काही लोकांनी या ट्विटवरुन ट्रोलही केले आहे.

 

View this post on Instagram

 

1971मध्ये लंडनमध्ये जन्म झालेल्या अदनाने2016 साली पाकिस्तानचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्विकारले. तो सध्या मुंबई राहातो व इथेच त्याची संगीत क्षेत्रातील कामं सुरु असतात. अदनानने. 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कामाला सुरुवात केली असून आजपर्यंत अनेक हिंदी सिनेमांना संगीत दिले आहे. त्याने गायलेली अनेक गाणी सुपरहिट देखील झाली आहे. 51 वर्षीय या गायकाला भारतीय चाहत्यांकडून नेहमीच प्रेम मिळत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जेव्हा मला सलमानचा भाऊ आणि मलायकाचा पती नावने ओळखले…;’ म्हणत, अरबाजने व्यक्त केले दु:ख
रवीनाचा सोशल मीडियावर कहर! गुलाबी ड्रेसमध्ये फुलले सौन्दर्य

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा