Tuesday, May 28, 2024

‘जेव्हा मला सलमानचा भाऊ आणि मलायकाचा पती नावने ओळखले…;’ म्हणत, अरबाजने व्यक्त केले दु:ख

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ओळखली जाणारा अरबाज खान याला अभिनयामध्ये फार काही यश मिळाने नाही, मात्र, दिग्दर्शक बनून त्याने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली. खान कुटुंबातमध्ये अरबाज आणि सोहेल खान यांच्यापेक्षा सलमान खान याला इंडस्ट्रीमध्ये अमाप प्रसिद्धी मिळाली मात्र, या दोन भावंडांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. याविषयी त्याने एका मुलाखतीमध्ये भावना व्यक्त केली.

अभिनेता आणि दिग्दर्शक अभिनेता याने नुकत्याचे दिलेल्या मुलाखतीत भाऊ सलमान खान (Salman Khan)आणि पत्नी मलायका अरोरा (Malayka Arora) यांच्याविषयी मोठा खूलासा केला आहे. अरबाज पेक्षा सलमान आणि मलायका हे जास्त प्रसिद्ध असल्याने त्याला सतत सलमानचा भाऊ किंवा मलायकाचा पती याच नावाने ओळखले जायचे. मात्र, अरबाजला देखिल आपले वेगळेच करिअर करायचे होते मात्र, त्याला चित्रपटामध्ये यश आले नाही. पूर्वी त्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायचा.

अरबाज खान याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, “एक वेळ अशी होती, जेव्हा मला अशा गोष्टींचं वाईट वाटायचं. आता जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा त्या गोष्टींला काही अर्थच नव्हता असं जाणवतं. सलीम खान (Salim Khan) यांचा मुलगा, सलमान खानचा भाऊ किंवा मलायका अरोराचा पती असा माझा उल्लेख केला जायचा. त्यावेळी मला खूप वाईट वाटायचं. मात्र, काही गोष्टी आपण बदलू शकत नाही. लोकांची मानसिकता बदलण्यात काहीच अर्थ नसतो.”

 

View this post on Instagram

 

अभिनेत्याने पुढे सांगितले की, “तुम्हाला फक्त संयमी व्हावं लागतं. मी या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि त्या मला कोणासमोर सिद्ध करायची गरज नाही. लोकांसाठी काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची गोष्ट खूप थकवणारी असते. तुम्ही हे कधीपर्यंत करू शकता? किती करू शकता? कोणत्या मर्यादेपर्यंत करू शकता? तुम्ही लोकांना खूश करू शकता का? ज्या दिवशी तुम्ही स्वत:ला इतरांपेक्षा अधिक महत्त्व द्याल तेव्हा तुम्हाला स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद मिळेल.”

 

View this post on Instagram

 

अभिनेता अरबाज खान हा आगामी येणारी ‘तनाव’ वेबसिरिजमुळे खूप चर्तेत आला आहे. या सिरिजचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा आणि सचिन कृष्णन यांनी केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आहा कडकच ना! मुख्य कालाकारांपेक्षा ‘हे’ बालकलाकार आपल्या अभिनयाने वेधतात प्रेक्षकांचे लक्षसाउथ सुपरस्टारर महेश बाबूचे वडील कृष्णा रुग्णालयात दाखल, माहिती देत शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा