भारतीय संगीतसृष्टीतील आठवे आश्चर्य म्हणून लता मंगेशकर यांचे नाव घेतले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आवाजाची दैवी देणगी असणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर ह्या संगीत क्षेत्रातल्या सर्वच लोकांचे श्रद्धास्थान आहेत. अदनान सामी देखील त्यांच्यातलाच एक. नुकताच अदनान सामीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोवरून लता मंगेशकर यांना ट्रोल केले जात आहे.
भारतीय गायक अदनान सामीने सोशल मीडियावर लता मंगेशकर, नूर जहाँ आणि आशा भोसले यांचा फोटो शेयर केला होता. एकीकडे सोशल मीडियावर या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असताना दुसरीकडे काही लोकांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात कमेंट पोस्ट केल्या आहेत. त्यातील एका युजरला अदनानने सडेतोड उत्तर दिले आहे.
What an Iconic & Historic Photo!#LataMangeshkar #NoorJehan #AshaBhosle ????????????@mangeshkarlata @ashabhosle pic.twitter.com/0nMEkFsC0R
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 14, 2021
अदनान सामीच्या पोस्टवर एका यूझरने लिहिले आहे की, ‘लता मंगेशकरांचा आवाज चांगला आहे असा विचार करण्यासाठी भारतीयांचे ब्रेन वॉश करण्यात आले आहे.’ याला उत्तर देताना अदनानने लिहिले की, ‘बंदर क्या जाने अदरक का स्वाद म्हणजेच साधारण गाढवाला गुळाची चव काय असे झापले आपल्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा गप्प बसून मूर्ख दिसणं केव्हाही चांगलं.’
'Bandar Kya Jaane Adrak Ka Swaad'.
…It’s better to stay silent and appear stupid than to open your mouth & remove all doubt!! https://t.co/kUi9dsfMGt— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 14, 2021
अदनानच्या एवढ्या बोलण्यावरूनही ही लोकं शांत बसली नाही. त्यांनी त्यांचे कमेंट करणे चालूच ठेवले.
दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी देखील अदनानचे समर्थन करत एक पोस्ट शेयर केली आहे. ते त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात, “मी देवाला प्रार्थना करतो की, लता मंगेशकर यांचा द्वेष करणारे पुढच्या जन्मी आमच्यासारखे मनुष्य होवोत, जेणेकरून त्यांना सुंदरता नक्की काय असते ते कळेल आणि देवत्व नक्की कसे असेल ते समजेल.” यासोबत त्यांनी अजून एक ट्विट केले आहे. ते त्यांच्या दुसर्या ट्वीटमध्ये म्हणतात, “माझा सरस्वती आणि दिव्यतेवर खूप विश्वास आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लता मंगेशकर. माझा ही राक्षसांवरही विश्वास आहे, याचे कारण म्हणजे लता मंगेशकर यांचा तिरस्कार करणारे लोक.’
I pray to God that in next life Lata Mangeshkar haters are born as humans like us who can understand beauty and understand what is truly divine.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 14, 2021
One of the reasons I believe in Saraswati and divine is because of Lata Mangeshkar.
One of the reasons I believe in devil is because of her haters.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 14, 2021