Friday, April 10, 2026
Home बॉलीवूड OTT रिलीजसाठी सज्ज शाहिद कपूरचा हा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर ठरला फिका, तर आता ottवर बदलणार का नशीब?

OTT रिलीजसाठी सज्ज शाहिद कपूरचा हा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर ठरला फिका, तर आता ottवर बदलणार का नशीब?

शाहिद कपूर हा लोकप्रिय अभिनेता आहे. आणि तो नेहमीच त्याच्या उत्तम चित्रपटाबाबत चर्चेत आसतो. तर आता काही दिवपसांपुर्वी रीलीज झालेला त्याचा चित्रपट म्हणजे ओ रोमीयो. त्याचा हा चित्रपट 13  फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नसली तरी, आता तो 10 एप्रिल 2026 रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपुरसोबत मुख्य भुमिकेत तृप्ती डिमरी, नाना पाटेकर आणि अविनाश तिवारी आहेत.

‘ओ रोमियो’ आता ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर भाड्याने घेण्यासाठी उपलब्ध आहे आणि 10 एप्रिल पासून सर्व सबस्क्राइबर्ससाठी उपलब्ध होईल. हा चित्रपट सूड, हिंसक प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि 1990 च्या दशकातील मुंबईतील धोकादायक अंडरवर्ल्ड यांसारख्या विषयांचा शोध घेतो. याची पटकथा विशाल भारद्वाज, रोहन नरुला यांनी लिहिली आहे. हा चित्रपट हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या कादंबरीवर आधारित आहे. ‘ओ रोमियो’ हा 1995 सालच्या मुंबईत घडणारा एक रोमँटिक ॲक्शन-थ्रिलर आहे.

ओ रोमियो या चित्रपटात कोणत्या कोणत्या कलाकारांना कोणती भुमिका साकरली आहे हे जाणुन घेवुयात, तर या चित्रपटात शाहिद (shahid)कपूरने उस्ताराची, तृप्ती डिमरीने अफशान कुरेशीची, नाना पाटेकरने डीसीपी इस्माईल खानची, अविनाश तिवारीने जलालुद्दीन शाहची, तमन्ना भाटियाने राबिया जलालुद्दीन शाहची, दिशा पटानीने ज्युलीची, फरिदा जलालने दादीची, हुसेन दलालने छोटूची आणि राहुल देशपांडेने इन्स्पेक्टर पाथरेची भूमिका साकारली आहे. ओटीटीवर प्रदर्शित आता झाल्यावर किती पंसतीस उतरतो हे पाहण्यासारखे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

9.4 रेटिंग असलेला 40 वर्षांपूर्वीच्या शो ने घातला होता धुमाकुळ, तर साधेपणाने जिंकली होती मनं

 

हे देखील वाचा