Sunday, April 19, 2026
Home बॉलीवूड बॉलिवूडच्या हिट जोडीचे स्टारडम ठरले फेल, 2000 साली आलेला हा चित्रपट ठरला होता फ्लॉप

बॉलिवूडच्या हिट जोडीचे स्टारडम ठरले फेल, 2000 साली आलेला हा चित्रपट ठरला होता फ्लॉप

प्रत्येक वर्षी चित्रपट येतात आणि जातात. तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत असतात. तसेच ते बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतात तर काही चित्रपट ते करू शकत नाही. मात्र कमाई जरी कमी झाली असेल तरी त्या चित्रपटाची कथा जर प्रेक्षकांना भावली तर ते प्रेक्षक कधीच विसरत नाहीत. तर अशा एका कथा बद्दल सांगणार आहोत ज्या चित्रपटांमध्ये अजय देवगन आणि काजोल, ऋषी कपूर आणि जॉनी लिव्हर यांच्या भूमिका होत्या. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.

‘राजू चाचा’ नावाचा हा चित्रपट  आहे. तर हा चित्रपट अनिल देवगण यांनी दिग्दर्शित केला होता. तर त्यांचे चुलत भाऊ अजय देवगण यांनी त्याची निर्मिती केली होती. या चित्रपटाद्वारे अजयने चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण केले. ‘राजू चाचा’ मध्ये अजय (ajay)देवगण आणि काजोल यांनी काम केले होते. जी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी आहे. ते खऱ्या आयुष्यातही एक प्रसिद्ध जोडपे आहेत. या लाडक्या जोडीने ‘प्यार तो होना ही था’, ‘इश्क’ आणि ‘दिल क्या करे’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ही जोडी हिट असली तरी, अजय आणि काजोलचा ‘राजू चाचा’ हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटाने जगभरात फक्त 20 ते 21  कोटी रुपये कमावले.

‘राजू चाचा’ या चित्रपटाला  IMDb वर 10  पैकी 5.1 रेटिंग मिळाले आहे. पण कथा चांगली आहे तर हा चित्रपट तुम्ही हा चित्रपट जिओ हॉटस्टार आणि यूट्यूबसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहू शकता. मात्र, प्राइम व्हिडिओवर पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. हा त्या काळातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता आणि जेव्हा तो फ्लॉप झाला, तेव्हा निर्मात्यांना मोठे नुकसान झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

आदित्य धर यांना दिलासा; संतोष कुमार यांच्या ‘धुरंधर’ स्क्रिप्ट चोरीच्या आरोपांवर मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

हे देखील वाचा