Tuesday, July 9, 2024

धक्कादायक! आमिर खाननंतर ‘या’ अभिनेत्याने केला सोशल मीडियाला अलविदा, म्हणाला ‘रिबूट…’

बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानने नुकतेच चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. तो असा की, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्ती आपल्या भावभावना इतरांपर्यंत पोहोचवतात, त्या सोशल मीडिया माध्यमाला त्याने राम राम ठोकण्याची घोषणा केली होती. यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने सोशल मीडियाला अलविदा केला आहे. हा अभिनेता इतर कोणी नसून सुशांत सिंग आहे.

सुशांतने सोमवारी (१५ मार्च) रात्री उशिरा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती चाहत्यांना दिली. त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते जोरदार कमेंट करत त्याला पुनरागमन करण्याची विनंती करत आहेत. सुशांत इतर अभिनेत्यांप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रिय असायचा. तो जवळपास सर्वच मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत असायचा. परंतु आता त्याने हा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे.

त्याने आपल्या ट्विटरवर केलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्रेक घेत आहे. रिबूट करण्याची आवश्यकता आहे.” त्याचे ट्विटर अकाउंट बंद असल्याचे दिसत आहे.

सुशांतच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हेही खूप महत्त्वाचं आहे.’ दुसरीकडे एक युजरने लिहिले की, ‘हेही ठीक आहे. सर्वत्र विष होत आहे.’ दुसऱ्या एका युजरने असे लिहिले की, ‘पूर्ण ताकदीने पुनरागमन करा.’

सोमवारी आमिर खानने आपले सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “नमस्कार मित्रांनो, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. तुमच्या अभिवादनांनी माझे हृदय अगदी भरून आले आहे. आणखी एक बातमी आहे की, सोशल मीडियावर माझी ही शेवटची पोस्ट असेल. मी अधिक सक्रिय आहे हे जाणून, मला आता हे थांबवायचे आहे. पूर्वी आपण जसे संपर्कात राहायचो, यापुढेही तसेच राहू. एकेपी (AKP- आमिर खान प्रॉडक्शन) ने स्वतःचे चॅनेल उघडले आहे. म्हणून माझ्याबद्दल आणि माझ्या चॅनेलबद्दल सर्व अपडेट तुम्हाला तिथे मिळतील.”

सुशांतच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘१६ डिसेंबर’, ‘सत्या’, ‘जोश’, ‘बेबी’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. चाहत्यांनीही त्याच्या अभिनयाला दाद दिली होती. याव्यतिरिक्त सुशांत ‘अ सिंपल मर्डर’ आणि ‘जीत की जिद’ या सीरिजमध्येही काम केले आहे. तसेच त्याने ‘सावधान इंडिया’ या मालिकेत सूत्रसंचालकाची भूमिकाही पार पाडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-“ही माझी शेवटची पोस्ट…” म्हणत आमिर खानने ठोकला सोशल मीडियाला ‘राम राम!’

-‘या’ कारणामुळे आलियाला नकोय वडील महेश भट्ट यांच्या सारखा नवरा! वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-बड्डे गर्ल आलियाने ९ वर्षांच्या करियरमध्ये कमावलीय तब्बल ‘एवढ्या’ कोटींची प्रॉपर्टी

हे देखील वाचा