Wednesday, July 3, 2024

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’नंतर आता साऊथचा ‘हा’ सिनेमा हिंदीत होणार रिलीझ; राम अन् समंथाचा किसींग सीन चर्चेत

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा: द राईज‘ चित्रपटाने सिनेमागृहांमध्ये जोरदार धुमाकुळ घातला आहे. या धमाकेदार चित्रपटाने पून्हा एकदा दाक्षिणात्य सिनेसृष्टीची जादू सर्वदूर पसरवली आहे. या चित्रपटाचे हिंदी रिमेक पाहण्याला प्रेक्षक जास्तीत जास्त पसंती दर्शवत आहेत. हिंदी भाषिक प्रेक्षकांचा हा जोरदार प्रतिसाद लक्षात घेत आता आणखी एक तामिळ चित्रपट हिंदी भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनही ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिनेमागृहात दाक्षिणात्य सिनेमाचा धमाका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ चित्रपटाने कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाला हिंदी भाषेत प्रदर्शित करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांकडून झाली होती. या मागणीचा विचार करत निर्मात्यांनी चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित केला होता. त्यानंतर चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हाच मुद्दा लक्षात घेत ‘पुष्पा’चे दिग्दर्शक ‘रंंगस्थलम’ या चित्रपटाला ही हिंदीमध्ये प्रदर्शित करणार आहेत.

उत्तर भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ‘रंगस्थलम’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रंगस्थलम’ हा २०१८ मध्ये तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट असून या वर्षी तो हिंदीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि राम चरण (Ram Charan) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

‘रंगस्थलम’ (Rangasthalam) चित्रपटाने फक्त कमाईचे विक्रमच मोडले नाहीत, तर अनेक प्रथांना फाटाही दिला आहे. चित्रपटातील प्रमुख अभिनेता राम चरणने एका बहिऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्याच्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतूक करण्यात करण्यात आले होते. आता हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्याने ग्रामीण भागाचा अभ्यास केला होता. हावभाव, भाषा आणि शब्द उच्चारणा या सगळ्याचा त्याने बारकाईने अभ्यास केला होता. या लोकप्रिय चित्रपटात राम चरण आणि समंथा रुथ प्रभूसह पूजा हेगडे, अनसुया भारद्वाज, जगपती बाबू आणि प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटातील किसींग सीनची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात समंथाने राम चरणसोबत किसींग सीन दिल्याने तिच्यावर जोरदार टीका झाली होती. मात्र, हा खरा किसींग सीन नसून ही सगळी व्हीएफएक्सची कमाल असल्याच तिने सांगितले होते. सुरुवातीला जेव्हा दोघांनाही या सीनसाठी विचारण्यात आले होते, तेव्हा दोघांनीही यासाठी नकार दिला होता, त्यामुळे दिग्दर्शकही चिंतेत आले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा