Friday, April 19, 2024

‘आमचे गोंधळ असतात कुल…’, म्हणत सिद्धार्थ जाधवने केला आगामी सिनेमाचा टिझर रिलीझ, तुम्ही पाहिला का?

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या रोज नवनवीन चित्रपटांची घोषणा होताना दिसत आहे. अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटांच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या चित्रपटाची माहिती चाहत्यांना देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय ठरलेला अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याच्या नव्या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. हा टिझर प्रेक्षकांना चांगलाच आवडला असून सोशल मीडियावर सध्या धूमाकुळ घालत आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा टिझर शेअर केला आहे. त्याने हा टिझर शेअर करत भन्नाट कॅप्शन लिहिले की, “आमचे गोंधळ असतात कुल, आमच्यासोबत व्हा लोच्याफुल. पाहा लोच्या झाला रेचा धमाल टीझर!!” या पोस्टमध्ये त्याने इमोजींचा समावेश करत चित्रपटातील इतर सहकलाकारांनाही टॅग केले आहे.

सिद्धार्थचा हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक कॉमेडी चित्रपट आहे. सिद्धार्थसोबत अंकुश चौधरी (Ankush Choudhary), वैदेही परशुरामी, सयाजी शिंदे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हे चारही दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट सुरेश जयराम यांच्या ‘लोच्या झाला रे’ नाटकावर आधारित असून पारितोषी पेंटर आणि रवी अधिकारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता अंकुश, वैदेही, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव या नव्या चित्रपटात काय धमाल करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थने ‘एक शून्य बाबुराव’ या कार्यक्रमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००४ मध्ये आलेला ‘अगं बाई अरेच्चा’ हा त्याचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर त्याने अनेक दर्जेदार चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २००६ मध्ये सिद्धार्थने रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याच्या विनोदी भूमिकेच सर्वत्र कौतुक झाल होते. त्याचा ‘सिंबा’ चित्रपटही प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा