Saturday, June 29, 2024

श्रीदेवीला हंटरने मारल्यानंतर खोलीत जाऊन ढसाढसा रडले होते रणजीत; खुद्द अभिनेत्यानेच केलेला खुलासा

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी खलनायकाच्या नकारात्मक भूमिका साकारूनही प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. हे खलनायक पडद्यावर जितके क्रूर वागायचे, दिसायचे खऱ्या आयुष्यात मात्र ते तितकेच हळवे होते. यातीलच एक लोकप्रिय अभिनेते म्हणजे रणजीत. रणजीत हे हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक होते. मात्र, पडद्यावर जितके ते क्रूर होते खऱ्या आयुष्यात ते खूप प्रेमळ होते, याचीच प्रचिती देणारा एक किस्सा त्यांनी सांगितला होता.

ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध खलनायक म्हणून रणजीत (Ranjeet) यांचे नाव घेतले जाते. त्यांनी त्याकाळात प्रत्येक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या अफलातून आणि दमदार अभिनयाने त्यांनी कला विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका त्या काळात प्रचंड गाजल्या. मात्र, एका चित्रपटात त्यांनी अभिनेत्रीला हंटरने मारले आणि सीन शूट झाल्यानंतर ते स्वत:च रडायला लागले. हा संपूर्ण किस्सा अभिनेते रणजीत यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितला होता.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मी आणि श्रीदेवी (Sridevi) एका चित्रपटात काम करत होतो. त्याचवेळी माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. त्या दिवशी आम्ही हैद्राबादमध्ये शूटिंग करत होतो. खूप धीट असणारा मी वडिलांच्या मृत्यूच्या बातमीने पूर्णपणे मोडून पडलो. देशभरातील नातेवाईक घरी यायला सुरुवात झाली होती. माझे वडील घरात मोठे होते.”

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत। Who Is Anchal Singh

यावेळी पुढे बोलताना अभिनेते रणजीत म्हणाले की, “मी वडिलांचे विधी उरकून पुन्हा शूटिंगसाठी विमानाने आलो. कारण पैसा वाया जावू नये. कॅमेऱ्यासमोर मी क्रूर खलनायकी हास्य हसलो आणि खोलीत येऊन रडायला लागलो. वडिलांच्या मृत्यूचे दुःख करावे की अभिनय करावा हेच समजत नव्हते.”

त्याचवेळी श्रीदेवीचे नाव घेत त्यांनी सांगितले की, “शूटिंगवेळी मी श्रीदेवीला हंटरने मारले आणि सीन झाल्यानंतर माझ्या खोलीत येऊन रडायला लागलो. त्यावेळी मी संपूर्ण दिवस आपले तोंड धूत होतो, आणि माझे दुःख सगळ्यांपासून लपवत होतो.”

रणजीत यांच्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडायच्या. मात्र, त्यांच्या घरचे त्यांना अशा भूमिका मिळतात म्हणून नाराज होते. याचाही खुलासा रणजीत यांनी केला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा