काही दिवसांपूर्वी मराठमोळी सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडकर यांच्यासोबत रेशीमगाठीत अडकली आहे. अलीकडेच हे नवदाम्पत्य फिरण्यासाठी पूर्व आफ्रिकेत गेले होते. या फिरण्याला अभिनेत्रीने ‘मिनिमून’ असे नावही दिले होते. तिने त्या ठिकाणाहून बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. एंजॉय करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडूनही चांगलेच पसंत केले गेले होते.
आता आपला ‘मिनिमून’ साजरा करून झाल्यानंतर, सोनाली पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. जवळपास दोन महिने एंजॉय करून, आता ती त्याच ऊर्जेने कामावर परतली आहे. यासंबंधित काही फोटो तिने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. नुकतेच तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती शेतात थांबलेली दिसत आहे. वास्तविक हे सेटवरचे फोटो आहेत.
या फोटोमध्ये सोनालीने मरून रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. शिवाय या फोटोमध्ये ती तिची पांढरी ओढणी हवेत फडकवताना दिसली आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “धरती सुनहरी…अंबर नीला……. हर मौसम रंगीला, ऐसा देश है मेरा.” या सोबतच ती म्हणतेय की, “कामावर परत. जवळपास दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच जम्मूमध्ये शूट.” २ महिने आपल्या वैयक्तिक आयुष्याला वेळ देत, सोनाली पुन्हा व्यावसायिक आयुष्याकडे वळल्याने चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिचे स्वागत करत आहेत. तसेच, अभिनेत्री गौहर खानने देखील सोनालीच्या फोटोला, ‘सो लव्हली’ म्हटल्याचे दिसत आहे. (after celebrating minimood sonalee kulkarni backs to work)
सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाली अखेरच्या वेळेस ‘युवा डान्सिंग क्वीन’ या टीव्ही शोमध्ये, नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्यसोबत जज म्हणून दिसली होती. ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’
-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका