Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरी जाणारी कंगना रणौत पोहोचली बाँके बिहारीचे दर्शन घ्यायला मथुरेत

पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरी जाणारी कंगना रणौत पोहोचली बाँके बिहारीचे दर्शन घ्यायला मथुरेत

बॉलिवूडची ‘पंगा’ गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या विळख्यात अडकली आहे. तिच्याशी संबंधित प्रत्येक बातमी सध्या चर्चेत असते. कंगनाने शेतकऱ्यांबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली होती. तेव्हापासून तिला शेतकरी संघटनांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच कंगनाच्या विरोधात शेतकरी जरा जास्तच आक्रमक दिसले. कंगनाच्या गाडीला पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या संघटनेने घेराव घातला, त्यानंतर कंगना अडचणीत आली. पंजाब सोडल्यानंतर कंगना मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीत पोहोचली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली.

कंगनाने शनिवारी (४ डिसेंबर) सकाळी तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, ती श्रीकृष्ण जन्मभूमीसाठी दिल्लीहून मथुरेला जात आहे. ती मथुरेला जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाला भेट देणार आहे. कारमध्ये बसलेला एक फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एका सुंदर सकाळी गाडी चालवत दिल्ली ते मथुरा कृष्णजन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. आजचा दिवस किती छान आहे.” कंगना पहिल्यांदाच मथुरा येथे श्रीकृष्ण जन्मभूमीला भेट देणार आहे.

वृंदावनमध्ये कंगनाचे भव्य स्वागत

कंगनाने तिच्या स्टोरीमध्ये पारंपारिक पोशाख परिधान केलेला एक फोटो टाकला आणि लिहिले की, ती श्री कृष्ण जन्मभूमीवर जाण्यासाठी खूप उत्साहित आहे. तिला विश्वास बसत नाही की, ती पहिल्यांदाच तिथे जात आहे. तेथे आल्याचे फोटो तिने शेअर केले. तिथे तिचे जल्लोषात स्वागत झाल्याचे त्या फोटोंमध्ये दिसत आहे. एका फोटोत एका मुलाने तिला मिठाई खाऊ घातली. फोटो शेअर करत तिने लिहिले, “हा मुलगा किती क्यूट आहे.” कंगनाच्या कपाळावर गंध असून, ती खूप आनंदी दिसत आहे. तिच्याभोवती चाहत्यांची गर्दी दिसत आहे.

कंगनाने पंजाबमधील महिलांची घेतली भेट 

कंगनाने शुक्रवारी (३ डिसेंबर) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती काही पंजाबी महिलांशी प्रेमाने बोलताना दिसत आहे. तिच्या गाडीची काच उघडून हात हलवत ती त्यांच्याशी बोलत आहे. या व्हिडिओसह तिने लिहिले आहे की, “सर्वांनी मला थांबवले आणि मग मी बोलले.” यादरम्यान त्या महिला आणि कंगना यांच्यात चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. यानंतर कंगनाने स्वत:ला सुरक्षित असल्याचे सांगितले आणि तेथून सुखरूप बाहेर पडल्याची माहिती दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा