Friday, July 5, 2024

चाहत्याच्या ‘त्या’ कृतीमुळे नीना गुप्ता यांनी व्यक्त केली खंत म्हणाल्या, ‘मी तर सार्वजनिक…’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यांना इंडस्ट्रीमध्ये ब्युटी विद ब्रेन अंसही उल्लेखलं जातं. अभिनेत्री आपल्या अभिनयासोबतच बिनधास्त स्वभावामुळे देखिल ओळखल्या जातात. नुकतंच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आल्या आहेत.

दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या सतत कोणत्याना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये इंडिया आर्ट्स फेस्टिव्हलला भेट दिली होती, या फेस्टिवलमध्ये त्यांनी चित्रांची पाहाणी केली त्याशिवाय त्यांच्यासोबत अनेकजण हा फेस्टिव्हल पाहाण्यासाठी आले होते. यापैकी एका चाहत्याने नीनीजींचा फोटो काढला त्यामुळे नीनाजी त्या व्यक्तीवर संतापल्या आणि म्हणाल्या की, “मी तर सार्वजनिक मालमत्ता आहे. ठीक आहे काही हरकत नाही.” (bollywood legend actress neena gupta viral video)

 

View this post on Instagram

 

शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांचा व्हिडिओ देखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी अनेक वर्ष या अभिनय क्षेत्राममध्ये काम केलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. नुकतंच त्यांनी संजय मिश्रा (Sanjay Mishra) याच्यासोबत वध (Vadh) चित्रपटामध्ये काम केलं आहे. वध चित्रपट हा काही दिवसांपसूर्वी झालेल्या श्रद्धा वालकर हतक्याकांड कथेशी निगडित आहे. त्याशिवाय त्यांनी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत उंचाई चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. (neena gupta fan’s says I’m public property. Okay, no problem.)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुपर अम्मा! ‘नाटु नाटु’ गाण्याच्या यशानंतर राम चरणच्या सासुबाईंचा रस्त्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल
मोठ्या दणक्यात सुरु आहे प्रभासच्या आगामी ‘सालार’ सिनेमाची शूटिंग, समोर आले फोटो

हे देखील वाचा