Monday, July 1, 2024

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी ऐकून शहनाझ गिलने सोडली शूटिंग, दोघांची लव्ह लाईफ होती चर्चेत

‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाने गुरुवारी (२ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांचे मन दुखावले आहे. अभिनेत्याच्या निधनाने बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या सर्वच लोकांना मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला रात्री औषध घेऊन झोपला आणि सकाळी उठू शकला नाही. सिद्धार्थ शुक्लाचे नाव शहनाझ गिलशी जोडले गेले आहे आणि दोघांनाही ‘सिडनाझ’ या नावाने चाहते ओळखत होते, पण आता फक्त ‘नाज’ उरली आहे. कारण, ‘सिड’ या जगाचा निरोप घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहनाझ गिल शूटिंगमध्ये व्यस्त होती आणि सिद्धार्थ आता या जगात राहिला नाही, हे कळताच तिने शूटिंग तशीच सोडली. शहनाझ गिलच्या मित्राने याबाबत माहिती दिली आहे. शहनाझ एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिचे नाव सिद्धार्थ शुक्लासोबत बऱ्याच काळापासून जोडले गेले आहे.

‘बिग बॉस’मध्ये दोघांच्या मैत्री आणि लव्ह एँगलने चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन केले होते. सिद्धार्थ आणि शहनाझ यांनी त्यांच्या नात्याला कधीच गंभीर स्वरुपात प्रेमाचे नाव दिले नाही, पण शहनाझ अनेकदा सांगायची की, सिद्धार्थ तिच्या सर्वात जवळचा आहे. बिग बॉसमध्येही तिने असेही म्हटले होते की, “फक्त सिद्धार्थच तिची स्तुती करू शकतो. त्या मुली पण काय, ज्यांना मुलांच्या जवळ बसले तरीही त्यांना जेलसी वाटू लागते.”

सिद्धार्थ आणि शहनाझच्या मैत्रीला अनेक वेळा आंबट- गोड हावभावांनी भरलेल्या प्रेमाचे नाव देण्यात आले. चाहते त्यांना प्रेमाने ‘सिडनाझ’ म्हणत होते. शहनाझ अनेकदा शोमध्ये खुलेपणाने सांगत असे की, ती प्रेमासाठी भुकेलेली आहे आणि सिद्धार्थने तिच्याजवळ राहावे. जेव्हा सलमानने खुलेपणाने शहनाझला विचारले की, ती आणि सिद्धार्थ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहेत का? तेव्हा ती म्हणाली, “नाही, पण आमच्यामध्ये काहीतरी आहे, ज्यावर सिद्धार्थनेही सहमती दर्शवली.”

‘बिग बॉस’ फेम शहनाझ गिलने एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की, “सिद्धार्थसोबतचे माझे नाते वेगळे आहे. तो माझ्या कुटुंबासारखा आहे.”

चाहत्यांना त्यांची जोडी इतकी आवडली की, ते त्यांच्या लग्नाबद्दलही बोलू लागले होते. अगदी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात शहनाझच्या कपाळावर सिंदूर दिसला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना असे वाटू लागले होते की, दोघांनीही गुप्तपणे लग्न केले आहे. नंतर असे दिसून आले की, हा फोटो फोटोशॉप केलेला आहे आणि असे काहीही घडले नाही. आता सिद्धार्थच्या जाण्याने ‘सिडनाझ’ची जोडी तुटली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

-बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा