बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) सकाळी मुंबईतील कूपर रुग्णालयात निधन झाले. त्याचे वय ४० होते. संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सिद्धार्थच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. अलीकडेच तो ‘बिग बॉस ओटीटी’च्या सेटवरही दिसला होता. सिद्धार्थचे अनेक सेलेब्रिटींसोबत मैत्रीचे नाते होते. मात्र, आता त्याने आपल्या मित्रमंडळींसह संपूर्ण कुटुंबाला मागे सोडले आहे.

सिद्धार्थ रात्री औषध घेतल्यानंतर झोपला होता. मात्र, गुरुवारी (२ सप्टेंबर) सकाळी तो उठलाच नाही. त्यामुळे, सिद्धार्थची बहीण आणि मेहुण्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले. दरम्यान, डाॅक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केले, पण सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबात आहेत ‘या’ व्यक्ती
मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थचे वडील अशोक शुक्ला हे सिव्हिल इंजिनिअर होते, तर आई रीता शुक्ला गृहिणी आहेत. त्याच्या वडिलांनी भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये काम केले होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू फुफ्फुसाच्या रोगामुळे झाला होता. तसेच त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. सिद्धार्थला शाळेत असताना टेनिस आणि फूटबाॅल खेळाची प्रचंड आवड होती. तो स्वतः एक उत्तम खेळाडू होता.

View this post on Instagram

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट नाही- पोलीस
सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. पोलीस म्हणाले की, ‘शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण सर्वांसमोर येईल. तसेच या प्रकरणात त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आणि जवळच्या लोकांचे मत नोंदवले जाणार नाही. आतापर्यंत सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत.’

सिद्धार्थने ‘या’ टीव्ही शोमध्ये केले काम
सिद्धार्थने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ‘खतरों के खिलाडी’, ‘बिग बॉस १३’, ‘बालिका वधू’सह अनेक मालिकांचा या यादीत समावेश आहेत. २००८ मध्ये, सिद्धार्थने ‘बाबुल का अंगना छूटे ना’ या मालिकेतून अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो ‘दिल से दिल तक’ या मालिकेतही दिसला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

-सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमागील ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचा विषय

Latest Post