Monday, July 1, 2024

जरा इकडे पाहा! कपिलचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर बाजारात विकतोय लसूण; पाहा व्हिडिओ

कॉमेडियन सुनील ग्रोव्हर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर बाजारात लसून विकताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनीलने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. कॉमेडियनचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून त्याचे चाहते नाराज झाले असुन त्यावर चर्चा करत आहेत. असे काय झाले की, एवढ्या मोठ्या कॉमेडियनला लसूण विकावा लागत आहे. असा एकच प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

काॅमेडियन सुनील ग्राेव्हर (Sunil Grover) याचे चाहते त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत त्याला अनेक प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “मित्रा आता लसूण विकून करोडपती बनण्याचा विचार आहे का?” तर दुसऱ्या एकाने लिहिले की,’तू रोज एक नवा धंदा शोधत आहे. तूला एकच धंदा करू वाटत नाही का? त्यामुळेच तू इतका तोट्यात जात आहे.” तर तिसऱ्याने लिहिले की, “सर दिल जीत लिया आपने… खरे प्रेम केले, पण तुमची कॉमेडी चुकली.” त्याचबरोबर काही चाहत्यांना त्याचा हा व्हिडीओ पाहून चांगलाच धक्का बसला आहे.

कॉमेडियन सुनील अनेकदा व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असताे. त्‍याने त्‍याच्‍या चाहत्‍यांचे मनोरंजन करण्‍यासाठी हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये विनोदी कलाकार भाजी मंडईत बसुन लसून विकताना दिसत आहे. तो वजन काट्यावर लसून मोजत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

 सुनील ग्राेव्हरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायच झाले, तर ताे अखेरचा ‘गुडबाय’ या चित्रपटात पंडितजींच्या भूमिकेत दिसला होता. 45 वर्षीय सुनील ग्रोवरला खरी ओळख ‘द कपिल शर्मा शो’मधून मिळाली होती. याव्यतिरिक्त त्याने ‘गब्बर इज बॅक’, ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ आणि ‘भारत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (After leaving Kapil’s show, Sunil Grover selling garlic in the market went viral on social media)

अधिक वाचा-
फटाके वाजवा रे! गायक अरमान मलिक आणि आशना श्रॉफ यांचा साखरपुडा संपन्न, फोटो व्हायरल
गणपतराव देशमुखच्या जीवनावर बनणार ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट; ‘हा’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

हे देखील वाचा