Thursday, June 13, 2024

एकेकाळी 500 रुपये महिना कमवायचा सुनील ग्रोव्हर; ‘गुत्थी’चे पात्र निभावून अशाप्रकारे बनला तो ‘कॉमेडीचा बादशाह’

या इंडस्ट्रीमध्ये असा एकही कलाकार शोधून सापडणार नाही, ज्याने या क्षेत्रात येण्यासाठी आणि इथे टिकण्यासाठी संघर्ष केला नाही. काही अपवाद वगळता सर्वच कलाकारांनी अतिशय कठीण परिश्रम घेत यश मिळवले आहे. ग्लॅमर जगात येणे म्हणजेच मोठ्या पडद्यावर अभिनय करणे नाही. याव्यतिरिक्त देखील अनेक क्षेत्रात येण्यासाठी कलाकार मेहनत घेतात. संगीत, गायन, कॉमेडियन आदी अनेक क्षेत्र आहेत.

कॉमेडी या प्रकाराला मागील काही वर्षांपासून खूपच जास्त महत्व आले आहे. कदाचित टीव्हीवर अनेक कॉमेडी शो आल्यामुळे कॉमेडियन्सला खूप महत्व प्राप्त झाले आहे. कॉमेडी करणे हे अजिबात सोपे नाही. ते म्हणतात ना की रडवणे सोपे आहे, मात्र हसवणे अवघड आहे. हेच हसवण्याचे अवघड काम करणारा प्रसिद्ध कॉमेडियन व्यक्ती म्हणजे सुनील ग्रोव्हर. (sunil grover)  सुनीलने त्याच्या कॉमेडीने त्याच्या वेगवेगळ्या कॉमेडियन भूमिकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा मोठे काम केले. आज सुनील त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल.

गुत्थी, रिंकू भाभी, डॉक्टर गुलाटी आदी लोकप्रिय भूमिका साकारणारा कलाकार अर्थात सुनील ग्रोवरचा जन्म 3 ऑगस्ट 1177 रोजी हरयाणातील मंडी, दाबवाली इथे झाला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची, मिमिक्रीची खूप आवड होती. शाळेत असताना तो नेहमी त्याच्या शिक्षकांची हुबेहूब नक्कल करायचा. त्याला लक्षात येत होते की, आपल्याला हे जमत आहे आणि आपण हे केल्यावर लोकांना ते आवडते देखील. इथूनच त्याची अभिनयाकडे ओढ निर्माण झाली. एका तो 12वी मध्ये असताना त्याने त्याच्या कॉलेजमध्ये अभिनयात भाग घेतला. त्याचा अभिनय पाहून तिथल्या परीक्षकांनी त्याला सांगितले की, “तू पुन्हा या स्पर्धांमध्ये भाग घेऊ नको. कारण तू जर भाग घेतला तर इतर स्पर्धकांसोबत चुकीचे होईल.” इतका प्रभावी त्याचा अभिनय होता. (happy birthday sunil grover)

सुनीलने पंजाब विद्यापीठातून थिएटरमध्ये पद्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर तो अभिनयात काम मिळवण्याच्या उद्देशाने मुंबईत आला. येथे आल्यानंतर पहिले वर्षभर त्याने फक्त पार्टी केली. घरून जे पैसे आणले ते आणि थोडी बचत असल्यामुळे त्याने मुंबईत एका पॉश भागात घर घेतले. त्यावेळी तो फक्त 500 रुपये महिना कमवत होता. त्याला वाटले तो खूपच लवकर या क्षेत्रात त्याचे बस्तान बसवेल. मात्र असा विचार करत असतानाच त्याला समजले की, त्याच्यासारखे असे अनेक लोकं या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होते.

लवकरच त्याची सर्व बचत संपली आणि कमाईचे मार्ग बंद झाले. त्याचा संघर्ष आता अधिकच वाढला. त्यामुळे त्याची मेहनत देखील वाढली. अशातच योगायोगाने त्याला एका मालिकेत काम मिळाले. त्याने काही दिवस या मालिकेचे शूटिंग केले. मात्र नंतर त्याला मालिकेकडून काही दिवसांनी शूटिंगच्या वेळेसाठी फोन येणे बंद झाले. मग त्याने स्वतः फोन करून विचारल्यावर त्याला समजले की, त्याला शोमधून काढून टाकण्यात आले.

सुनीलने जसपाल भट्टी यांच्या ‘प्रोफेसर मनी प्लांट’, त्यानंतर ‘गुटर गू’ या सायलेंट ड्रामामध्ये दिसला. या मालिकेत एकही संवाद नव्हता, मात्र सुनीलने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर त्याची छाप सोडली. काही दिवस सुनीलने व्हाइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील काम केले. त्यावेळी त्याला रेडिओ मिर्चीमध्ये सुद्धा काम करायची संधी मिळाली. इथे त्याचा ‘हंसी के फव्वारे’ हा शो खूपच लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याला हळूहळू सिनेमे आणि इतर टीव्ही शोमध्ये काम मिळू लागले. त्याने ‘मैं हू ना’, ‘द लीजेंड ऑफ भगत सिंग’, ‘फकीरा’, ‘जिला गाजियाबाद’, ‘गब्बर इज बैक’, ‘गजनी’, ‘भारत’ आदी सिनेमांमध्ये काम केले.

अखेर त्याच्या आयुष्यात ‘कॉमेडी नाइट्स विद् कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ हे शो आले आणि त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. या शोमध्ये त्याने निभावलेल्या सर्वच भूमिका सुपरहिट ठरल्या. या शोने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी देणारा हा शो त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. त्याच्या भूमिकांमुळे सुनील घराघरात पोहोचला आणि लोकप्रियही झाला.

सुनीलने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मला आठवते, एकदा मी स्टेजवर लाईव्ह शो करत होतो आणि तेव्हा अचानक लोकांमधून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. मला वाटले दुसऱ्यासाठी असेल, पण नंतर समजले की स्टेजवर मी एकटाच होतो, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. हेच तर मला मिळवायचे आहे.”

सुनीलने ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ शोमध्ये गुत्थी आणि ‘द कपिल शर्मा शो’ शोमध्ये डॉक्टर मशहूर गुलाटी हे पात्र साकारले होते. मात्र सुनील आणि कपिल यांच्यात दोन वर्षांपूर्वी वाद झाले. एका प्रवासादरम्यान कपिलने दारूच्या नशेत सुनीलला शिवीगाळ केली आणि त्यांच्यात फूट पडली. सुनीलची काही दिवसांपूर्वीच ‘सनफ्लॉवर’ नावाची वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे.

एका रिपोर्टनुसार त्याच्याकडे 18 कोटींची संपत्तीची आहे. एका वर्षात तो 3 कोटी रुपये कमावतो. एका सिनेमासाठी त्याला 25/30 लाख आणि टीव्ही शोसाठी 15/20 लाख रुपये मिळतात. सुनीलला अनेक महागड्या गाड्यांची देखील खूप हौस आहे. त्याच्याकडे Range Rover, BMW, Audi आदी अनेक महाग गाड्यांचे कलेक्शन आहे.

सुनीलने आरती ग्रोव्हरसोबत लग्न केले असून, आरती एक इंटेरियर डिझायनर आहे. या दोघांना मोहन नावाचा एक मुलगा देखील आहे.

अधिक वाचा-
नितीन देसाई यांच्या पार्थिवावर ‘या’ ठिकाणी होणार अंत्यसंस्कार; जाणुन घ्या सविस्तर माहिती
‘ही बार्बी नाही, म्हैस आहे….’ बॉडी शेम करणाऱ्यांवर वाहबिज दोराबजींने दिलं सडेतोड उत्तर

हे देखील वाचा