आई- वडिल नसणे हे कोणत्याही मुलांसाठी खूप वेदनादायी गोष्ट आहे. अनेकदा मुल मोठी झाली तरीही काही प्रसंग असे येतात की, त्यावेळी त्यांना आई-वडिलांची खूप गरज असते. पण त्यावेळी ते जवळ नसतील तर मुलं डिप्रेशनमध्ये जातात. अशीच घटना प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान सोबत धडली आहे. शाहरूख खानला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. नुकताच शाहरूखने एक हृदयस्पर्शी खुलासा केला आहे.
शाहरुख खानला बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हटले जाते. तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात राहण्यासाठी चित्रपटात काम करून असतो. आपल्या दमदार अभिनयाने आणि सुंदर शैलीने त्याने देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावले आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की, जगातील माणसांच्या मनाव राज्य करणाऱ्या शाहरुख खानच्याही मनात खूप दुःख आहे. पण, त्या समस्येतून स्वतःला कसे बाहेर काढायचे याची कलाही त्यांना चांगलीच अवगत आहे. चला जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही गोष्टींविषयी.
शाहरुख खानने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, तो त्याच्या दुःखावर मात करण्यासाठी चित्रपट करतो. चित्रपट बनवणे आणि अभिनय करणे हाच त्याचे दुःख दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे. तसेच शाहरुखने आपली व्यथा मांडताना असेही म्हटले होते की, त्याच्या आयुष्यातील एकमेव समस्या म्हणजे आई-वडिलांचं त्याच्या आयुष्यात नसणे.
शाहरुख खानच्या वडिलांचे वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले. शाहरुख त्यावेळी किशोरवयीन होता. यानंतर काही वर्षांनी त्यांच्या आईचेही निधन झाले. वडिलांप्रमाणेच त्यांच्या आईचेही वयाच्या 52व्या वर्षी निधन झाले. शाहरुख खानने ‘द इनर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान’ नावाच्या डॉक्युमेंट्रीमध्येही आपल्या आई-वडिलांचा उल्लेख केला आहे.
त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले तेव्हा शाहरुख खानची बहीण त्याच्यासोबत राहायची. आपल्या बहिणीबद्दल बोलताना त्याने सांगितले होते की, त्याची बहीण खूप हुशार विद्यार्थी आहे. पण, दुर्दैवाने तिची प्रकृती ठीक नाही. आई-वडील गमावल्यानंतर ती खूप अस्वस्थ झाली. अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या वडिलांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्यामुळे तो पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देतो.
गौरी अनेकदा शाहरुख खानबद्दल तक्रार करते की, तो नेहमी कामात मग्न असतो. पण, तो असे का करतो हे कदाचित तिला माहीत नसेल. केवळ अभिनयाच्या जोरावर स्वत:ला सांभाळून ठेवल्याचे शाहरुखचे म्हणणे आहे. त्यांच्यासाठी अभिनय किती महत्त्वाचा आहे हे लोकांना कदाचित माहीत नसेल. त्याच्यासाठी पैसा मिळवणे किंवा कोणताही पुरस्कार जिंकणे किंवा प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा चित्रपट बनवणे महत्त्वाचे आहे. (After losing his parents Shahrukh Khan started to suffer from depression)
आधिक वाचा-
–आलिया नाहीतर ‘या’ खास व्यक्तीच्या नावाचा रणबीरने मानेवर काढलाय टॅटू, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ
–गुप्तहेराच्या भूमिकेत आलिया भट्ट कितपत शोभेल? इमरान हाश्मीच्या कमेंटने वाढवली खळबळ