Sunday, May 19, 2024

गिरीजा ओकने शाहरूख खान विषयी केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘भर पार्टीत त्याने माझा हात धरला अन्…’

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात झळकलेली मराठी अभिनेत्री गिरीजा ओकने अ‍ॅटलीच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक खास किस्सा शेअर केला आहे. या पार्टीत शाहरुख खानने गिरीजा ओकला दिलेली खास साथ ही तिला कधीही विसरता येणार नाही, असे तिने सांगितले. शाहरूख खानला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. शाहरूख खानचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

‘मॅजिक 106.4एफएम’ या रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा ओक म्हणाली की, “अ‍ॅटली सरांच्या वाढदिवसानिमित्ताने चेन्नईत एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या पार्टीत शाहरुख खान, गिरीजा ओक, प्रिया, लेहेरे आदी कलाकार उपस्थित होते. पार्टीत मी, प्रिया आणि लेहेरे आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. बाकीच्या मुली आमच्या पुढे निघून गेल्या होत्या. शेवटी, शेवटी आम्ही ज्या ग्रुपमध्ये नाचत होतो, तिथे शाहरुखची (Shahrukh Khan)  मॅनेजर पूजा ददलानी होती आणि तो देखील होता. त्याआधी त्याने आम्हाला पूल टेबलवर स्टीकने बॉल कसे मारायचे हे शिकवलं होतं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला. मग शाहरुखने आम्हाला विचारलं, तुम्ही कसे चालला आहात? मग आम्ही त्याला सांगितलं प्रोडक्शनची गाडी आहे. त्यानंतर तो म्हणाला, थांबा थांबा आणि आम्हाला सगळ्यांना खालीपर्यंत सोडायला आला.”

गिरिजा ओक पुढे म्हणाली की, “शाहरुख खान हा एक अतिशय दयाळू आणि प्रेमळ व्यक्ती आहे. त्याने मला पार्टीमधल्या गर्दीमधून माझा हात धरून बाहेर काढलं. त्यावेळी माझ्या मनात ‘आंखों में तेरी’ या गाण्यातला तो प्रसंग आला होता. माझ्या हातात त्याचा हात होता आणि मी तरंगत तरंगत पार्टीतून बाहेर पडत होते. खाली येईपर्यंत त्याने माझा हात सोडला नाही आणि मला गाडीत बसवलं.”

गिरिजा ओकच्या या किस्सामुळे शाहरुख खानच्या व्यक्तिमत्त्वाची एक नवी ओळख समोर आली आहे. शाहरुख खान हा केवळ एक यशस्वी अभिनेता नाही, तर तो एक चांगला माणूस देखील आहे, हे या किस्सामधून स्पष्ट होते. (Girija Oak made a shocking revelation about Shahrukh Khan)

आधिक वाचा-
एवढ्या राजेशाही घराण्यात जन्म होऊनही सोहाला करावा लागली होती बँकेत नोकरी
कृती सेननने शेअर केला कीलर लूक; फोटो पाहून व्हाल थक्क

हे देखील वाचा