Tuesday, May 21, 2024

रश्मिकानंतर आता काजोल बनली डीपफेक व्हिडिओची शिकार, अभिनेत्रीचे कपडे बदलतानाचे अश्लील फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसांपुर्वी रश्मिका मंदान्ना बनावट व्हिडिओ व्हायरल झाला होता. रश्मिकानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलही या तंत्राची शिकार झाली आहे. होय, काजोलचा एक अश्लील व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सध्या सोशल मीडियावर काजोलचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा एका दुसऱ्याच मुलीचा आहे. मात्र एडिटिंग (Editing) करुन त्या व्हिडीओला (Viral Video)काजोलचा चेहरा लावण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या व्हिडीओवरुन प्रचंड गदारोळ चालू आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील पद्धतीने सादर करण्यात आले आहे. डीपफेकने संपादित केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री काजोल (Kajol ) कपडे बदलताना दिसत आहे. काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर तिचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना ‘काजोल देवगण कॅमेऱ्यात कपडे बदलताना कैद झाली’ असे लिहिले आहे.

व्हिडिओमध्ये काजोल कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दिसत आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती काजोल नसून दुसरीच व्यक्ती आहे. तिने टिक-टॉकवर तिचा हा व्हिडिओ शेअर केला, जो खूप व्हायरल झाला. जून महिन्यात तिने हा व्हिडिओ शेअर केला होता. जर तुम्ही हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला चेहरा अनेक वेळा बदलताना दिसेल. रश्मिका मंदान्ना प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबरला एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर 15 नोव्हेंबरला आरोपी सापडला.

डीपफेकचा कोणीही बळी होऊ शकतो. तुमच्याशी वैर करण्यासाठी कोणीही तुमचा डीपफेक फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करू शकतो. अशी शक्यता नाकारता येत नाही हे स्पष्ट आहे. डीपफेक टाळण्यासाठी, तुम्हाला तुमची ऑनलाइन उपस्थिती कमीत कमी ठेवावी लागेल. याचा अर्थ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सावधगिरीने केला पाहिजे. सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्याने तुम्हाला धोका होऊ शकतो. म्हणून, सोशल मीडिया अकांऊट सार्वजनिक ऐवजी खाजगी ठेवा आणि त्याला पासवर्ड वापरा. (After Rashmika Mandanna now Kajol has become a victim of deepfake video)

आधिक वाचा-
पैशावाल्यांचे गिफ्ट बी भारीच राव! मितालीने नवरा सिद्धार्थला पाडव्याचे दिले ‘हे’ महागडे गिफ्ट
सिनेमासोबतच राजकारणाचं मैदानही गाजवणार माधुरी दीक्षित? ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढविण्याची चर्चा

हे देखील वाचा