Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक योगदान कोणत्या कुटुंबाचं आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर सर्वांच्या तोंडात आपसुकच एकच नाव येते, ते म्हणजे ‘कपूर खानदान’ होय. या खानदानात आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे शनिवारी (१४ ऑगस्ट) अनिल कपूर यांची लहान मुलगी रिया कपूर आपल्या दीर्घ काळापासून असलेल्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच करण बुलानीसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. यावेळी जवळची मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य सामील झाले होते. दुसरीकडे सोनम कपूरचा चुलत भाऊ मोहित मारवाह आणि त्याची पत्नी अंतरा मोतीवाला मारवाहच्या घरी लवकरच नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

खरं तर मोहित आणि त्याची पत्नी अंतरा लवकरच आई- वडील बनणार आहेत. बुधवारी (१८ ऑगस्ट) अंतराचे बेबी शॉवर होते. यावेळी सोनम कपूर, रिया कपूर, खुशी कपूर, अर्जुन कपूर, अंशुला कपूर आणि शनाया कपूर या भावंडांनी हजेरी लावली होती. (After Rhea Kapoor Wedding Kapoors All Family Attend Antara Marwah Godh Bharai)

अंतरच्या बेबी शॉवरचे अनेक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. ज्यात कपूर भावंडांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. सोनम कपूरनेही अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अंतराच्या बेबी शॉवरचे काही फोटो शेअर केले आहेत.

सोनमने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अंतराच्या बेबी शॉवरसाठी खानदान.” यासोबतच तिने बेबी शॉवरमध्ये सामील होऊ न शकलेल्या जान्हवी कपूर, आहान कपूर, हर्षवर्धन कपूर या सर्वांना टॅगही केले आहे.

सोनमव्यतिरिक्त खुशी, शनाया आणि अर्जुननेही बेबी शॉवरचे सुंदर फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत कपूर भावंडांचा अनोखा अंदाज पाहण्यासारखा आहे. चाहतेही या फोटोंवर दिलखुलास कमेंट्स करत या कलाकारांची प्रशंसा करत आहेत.

सोनम सध्या भारतात आहे आणि ती जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?

-सलमान, करण जोहर नंतर आता बिग बॉसमध्ये होणार एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांची एन्ट्री?, ‘ही’ मोठी जबाबदारी त्या सांभाळणार

हे देखील वाचा