Wednesday, July 3, 2024

बॉलिवूडकरांवर संकट! सलमाननंतर त्याचाच प्रसिद्ध हिरोईनला जीवे मारण्याची धमकी? एकदा वाचाच

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री पूजा हेगडेला (Pooja Hegde) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती. दुबईतील एका क्लबच्या उद्धाटन कार्यक्रमात पूजा हेगडे आणि एका व्यक्तीमध्ये वाद झाल्यानंतर ही धमकी मिळाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या प्रकरणात पूजा हेगडेच्या टीमने स्पष्टीकरण दिलं आहे.

पूजा हेगडेच्या (Pooja Hegde News) टीमने दिलेल्या माहितीनुसार, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. पूजा हेगडेला कोणत्याही प्रकारची जीवे मारण्याची धमकी (Pooja Hegde Death Threat) मिळालेली नाही. ही बातमी सोशल मीडियावर चुकीच्या माहितीच्या आधारे पसरवण्यात आली आहे. पूजा हेगडे सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. लवकरच ती शाहिद कपूरसोबत ‘देवा’ या चित्रपटात आणि अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफूल 5’ या चित्रपटात दिसणार आहे.

पूजा हेगडेच्या टीमने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूजा हेगडे सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावते. पूजा हेगडेच्या आगामी चित्रपटांवर तिच्या चाहत्यांचे मोठे लक्ष लागले आहे. पूजा हेगडेचे लाखो चाहते आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. ती नुकतीच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकली होती. (Did Pooja Hegde Get Death Threat After Heated Argument In Dubai Club)

पूजा हेगडे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. पूजा हेगडे हिने तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. सध्या पूजा हेगडे तिच्या ‘हाऊसफूल 5’ शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्या सोबत अर्शद वारसी, पूजा हेगडे, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, दिशा पटानी, रविना टंडनही दिसणार आहेत. (After Salman his famous heroine Pooja Hegde is threatened with death)

आधिक वाचा-
‘…तर मला वाटतं मी अभिनयाचं दुकानच बंद केलं पाहिजे’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच खळबळजनक भाष्य
रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीने ढसाढसा रडत लिहिली पोस्ट; म्हणाली, ‘काळीज…’

हे देखील वाचा