Friday, December 1, 2023

बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देत पूजा हेगडे बनली सर्वात व्यस्त अभिनेत्री; खात्यात आहेत ‘इतके’ चित्रपट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटविणारी अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या बोल्ड लूक आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. ती दरदिवशी तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते, जे खूप व्हायरल होतात.

पूजा सध्या दक्षिण भागात अधिक सक्रिय आहे आणि सर्वात व्यस्त अभिनेत्री बनली आहे. एकीकडे तिच्याकडे बाहुबली फेम प्रभासचा चित्रपट आहे, तर ती अभिनेता विजयसोबतही एका तमिळ चित्रपटात दिसणार आहे.

पूजा हेगडेचे बॅक टू बॅक अनेक चित्रपट रिलीझ झाले आणि या सर्वांनी जबरदस्त कमाई केली. ज्यामुळे आता तिला एखाद्या छोट्या भूमिकेसाठीही चांगले पैसे मिळू लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आचार्य’ या चित्रपटातही पूजाला एका छोट्या भूमिकेसाठी खूप जास्त मानधन दिले गेले होते.

त्याचबरोबर महेश बाबू आणि त्रिविक्रमच्या आगामी चित्रपटासाठी पूजाच्या नावाची चर्चा आहे. अशा परिस्थितीत ती जर चित्रपटाचा भाग बनली तर तिला मोठी रक्कम मिळू शकते. पूजाने दिग्दर्शक त्रिविक्रमसोबत ‘अला वैकुंठपुरमालो’ चित्रपटातही काम केले आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अल्लू अर्जुन दिसला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले होते.

तेलुगु सिनेमाची सर्वात व्यस्त अभिनेत्री पूजा अभिनेता अखिलसोबत ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’मध्ये आणि प्रभास सोबत ‘राधेश्याम’मध्ये दिसणार आहे. याशिवाय इतर अनेक मोठ्या तेलुगु आणि हिंदी प्रकल्पांमध्येही पूजा काम करताना दिसणार आहेत. इतकेच नाही तर तेलुगुव्यतिरिक्त तमिळ चित्रपटात पूजालाही बरीच मागणी आहे. दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या चित्रपटात ती लवकरच सुपरस्टार विजयसोबत दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CGxYfwJn6wp/?utm_source=ig_web_copy_link

पूजा हेगडेने ऋतिक रोशनच्या ‘मोहनजोदारो’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती मल्टीस्टारर फिल्म ‘हाऊसफुल 4’ मध्येही दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘द बिग बुल’ पाहून युजरने अभिषेक बच्चनच्या अभिनयाला म्हटले ‘थर्ड क्लास’, त्यानेही दिले गांधीगिरी स्टाईलमध्ये प्रत्युत्तर

-खरंच! राहुल वैद्य आणि दिशा परमारने केले गुपचुप लग्न? फोटो पाहून चाहते करतायत अभिनंदन

-धक्कादायक! बिग बॉस कन्नडच्या माजी कंटेस्टेंटचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; सासरच्यांवर केले गंभीर आरोप

हे देखील वाचा