Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड संजय दत्त- शाहरुख खाननंतर, बोनी कपूर यांना मिळाला दुबईचा गोल्डन वीजा; ट्वीट करत दिली माहिती

संजय दत्त- शाहरुख खाननंतर, बोनी कपूर यांना मिळाला दुबईचा गोल्डन वीजा; ट्वीट करत दिली माहिती

परदेशामध्ये जाण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण अपार कष्ट आणि मेहनत करतात आणि आपल्याला हवं त्या ठिकाणी मौज मज्जा करतात. अशात कलाकारांचे म्हटले, तर कलाकार आपल्या आयुष्यामध्ये दमदार अभिनयाने आणि यशस्वी चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकतात. त्यांच्या एका चित्रपटाचे मानधन हे देखील कोटींच्या घरात असते. त्यामुळे दुबई सारख्या ठिकाणी त्यांना जाणे सहजच शक्य होते. अशात बॉलिवूडमधील दिग्गज आणि गाजलेल्या कुटुंबियांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंबीय. यांना देखील स्वप्नातल्या दुबईमध्ये पाऊल ठेवण्याची संधी मिळाली आहे.

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्यासह कुटुंबियांना गोल्डन वीजा मिळाला असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. कपूर कुटुंबियांना तब्बल १० वर्षांसाठी हा वीजा मिळाला आहे. बोनी यांनी १४ सप्टेंबर रोजी एक ट्वीट करत याची माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, “मला आणि माझ्या परिवाराला १० वर्षांसाठी गोल्डन वीजा दिल्याबद्दल दुबई सरकारला धन्यवाद.” दुबईचा गोल्डन वीजा मिळाल्याने कपूर कुटुंबीय फार खुश आहेत. (After Sanjay Dutt and Sunil Shetty Boney Kapoor and his family got golden visa for Dubai)

गोल्डन वीजामध्ये काय आहे विशेष
दुबईमध्ये गोल्डन वीजाबद्दल पहिल्यांदा साल २०१९मध्ये जाहीर करण्यात आले. यूएईचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष तसेच शासक मोहम्मद बिन रशीद शेख अल मकतूम यांनी ही योजना आणली. या मागील मुख्य उद्देश हा होता की, यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व असलेल्या मोठ्या कंपन्यांचे मालक, व्यावसायिक, गुंतवणूकदार तसेच संशोधक आणि होतकरू विद्यार्थी यांना दुबईच्या विकासात भागीदार म्हणून आणणे. हा गोल्डन वीजा ५ ते १० वर्षांसाठी मिळतो. त्यानंतर आणखी काही दिवस दुबईमध्येच राहायचे असेल, तर रिन्यू देखील होतो.

बॉलिवूडमधील कलाकारांमध्ये हा वीजा प्रथम संजय दत्तला मिळाला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार मोहनलाल आणि ममूटीने गोल्डन वीजा मिळाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती. शाहरुख खान, संजय दत्त, सुनील शेट्टी, ममूटी, मोहनलाल आणि टोविनो थॉमस अशा कलाकारांना दुबईने गोल्डन वीजा दिलेला आहे.

साल २०१८मध्ये बोनी यांच्या पत्नी आणि सर्वगुण संपन्न अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. पाण्यात बुडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या त्यांच्या परिवारातील एका नातेवाईकांच्या घरी लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. घरातील बाकीचे सदस्य लग्न संपवून घरी परतले होते. परंतु श्रीदेवी तेथेच राहिल्या होत्या. त्यांचे पती बोनी कपूर यांच्या चित्रपटांनी देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. ज्यामध्ये ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘वॉन्टेड’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच की! ‘अरुदीप’ची नवं गाणं आलं रसिकांच्या भेटीला; त्यांच्या जुगलबंदीने पुन्हा केलं सर्वांना प्रभावित

-खास मित्रासह अंडरवॉटर मजा करताना दिसली ‘सोनू’; बिकिनी लूकने तर सर्वांनाच केलंय चकित

-ट्रेंडिंग गाण्यावर ‘स्वीटू’नेही धरला ताल, गोड अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा