Tuesday, March 5, 2024

शाहरुख खाननंतर क्रिती सॅननला मिळाला गोल्डन व्हिसा, पाहा काय आहे तिची प्रतिक्रिया

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री क्रिती सॅनन(Kriti Sanon) ही बॉलिवूडमधील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. आपल्या कलेच्या जोरावर तिने देशभरातंच नव्हे तर परदेशातही मोठा चाहतावर्ग बनवला आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने एक मोठी कामगिरी केली आहे. अलीकडेच तिला प्रतिष्ठित युएई(UAE) गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे. यानंतर, ती शाहरुख खान(Shah Rukh Khan) सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींच्या श्रेणीत सामील झाली आहे, शाहरुख खानला यापूर्वी हा सन्मान मिळाला आहे.

2019 पासुन युनायटेड अरब अमिराती (युएई) द्वारे दिले जाणारे, गोल्डन व्हिसा सिस्टम जास्त काळासाठी निवासी व्हिसाची सुविधा देते, ज्यामुळे परदेशी लोकांना राष्ट्रीय स्पाँसरची गरज लागत नाही आणि त्यांच्या 100 टक्के मालकीसह युएई मध्ये राहण्याची, काम करण्याची, व्यवसाय करण्याची किंवा अभ्यास करण्याची परवानगी मिळते.

ईसीएच डिजिटलचे सीईओ इक्बाल मार्कोनी यांच्याकडून क्रिती सॅननला हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना क्रिती म्हणाली, “यूएईचा गोल्डन व्हिसा मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. दुबईला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि मी तिथल्या जीवंत सांस्कृतीचा एक भाग बनण्यासाठी उत्सुक आहे.”

क्रितीच्या आधी, शाहरुख खान, त्याचे कुटुंब, संजय दत्त, सानिया मिर्झा(Saniya Mirza), बोनी कपूर आणि त्यांची मुले अर्जुन, जान्हवी, खुशी आणि अंशुला कपूर, संजय कपूर, वरुण धवन, रणवीर सिंग, कमल हसन, मोहनलाल, मामूट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना हा व्हिसा मिळाला आहे. त्यांच्याशिवाय दुलकर सलमान, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, फराह खान, सोनू सूद, टोविनो थॉमस आणि अमला पॉल यांनाही हा सन्मान मिळाला आहे.

क्रितीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, क्रिती सेनन ही अमित जोशी आणि आराधना साह यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलरही रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळत आहे. या चित्रपटात ती रोबोटची भूमिका साकारत आहे. फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

हे देखील वाचा