Friday, August 8, 2025
Home अन्य शहनाजनंतर आता ‘ही’ बिग बॉस स्पर्धक बनणार सलमान खानची नवी हिरोईन

शहनाजनंतर आता ‘ही’ बिग बॉस स्पर्धक बनणार सलमान खानची नवी हिरोईन

सध्या बिग बॉस 16मध्ये खूप उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मित्र शत्रू होत आहेत आणि शत्रू मित्र बनत आहेत. सर्वात मोठा बदल हा सलमान खानचा आहे. ताज्या एपिसोडमध्ये, भाईजान पहिल्या दिवसापासून ज्या स्पर्धकाबद्दल वाईट बोलत होता, जो तिला घर पेटवणारी व्यक्ती म्हणत होता, तिची आता तो प्रशंसा करताना दिसणार आहे. त्याने हे पण म्हटले आहे की तू चित्रपटात हिरोईन बनू शकतेस पण एका अटीवर…

सलमान खानने या स्पर्धकाला दिली नायिकेची उपमा:
वीकेंड का वारच्या एपिसोडमध्ये सलमान खानने शालीन भानोत आणि टीनाचा क्लास घेतला. त्यांच्यातील नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी एम सी स्टॅन आणि अर्चना गौतम यांना फटकारले. या सगळ्यामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट घडली ती म्हणजे सलमान खानने प्रियंका चहर चौधरीचे कौतुक केले.

प्रियांका चहरचे झाले कौतुक:
सलमान खानने प्रियंका चहरला हिरोईन मटेरिअल म्हटले आणि तू खूप मोठी हिरोईन बनू शकतेस असे सांगितले. सलमान खानने बिग बॉस फेम शहनाज गिलला त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात कास्ट केले आहे. तर दुसरीकडे सलमान खानने याआधीच प्रियांकाला प्रत्येक भांडणात उडी मारल्याबद्दल फटकारलेही आहे. तो म्हणाला होता की जेव्हा जेव्हा वाद होतो तेव्हा तु त्यात आग लावते आणि गोंधळ वाढतो.

शो जिंकण्याची आहे आशा:
लाल रंगाच्या साडीमध्ये प्रियंका खूपच सुंदर दिसत होती आणि साजिद खाननेही प्रियांकासाठी हेच सांगितले. तो म्हणाला की तू हा शो जिंकला आहेस आणि तुला चित्रपटांमध्ये आरामात काम मिळेल. नुकतेच रुबिना दिलीकनेही व्यक्त केले होते की तिला वाटते की फक्त प्रियंका चहर शोची विजेती होईल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कमाईत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या ‘युट्यूबचा बादशाह’ भुवन बामची नेट वर्थ आहे तरी किती? जाणून घ्याच
हीच ती नैसर्गिक सुंदरता! रश्मिकाने विमानतळावर बिनधास्तपणे काढला मास्क; पाहायला मिळाला नो मेकअप लूक

हे देखील वाचा