Sunday, April 14, 2024

‘भाईजान’ला त्याच्याच मित्रांनी काढलेले सिनेमातून बाहेर, वडिलांकडेही नव्हते काम; 30 वर्षांनी हळहळला सलमान

चार दिवसांपूर्वी 27 डिसेंबर रोजी अभिनेता सलमान खान याने 57वा वाढदिवस साजरा केला. सलमानला बॉलिवूड इंडस्ट्रीत आता तीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या सर्व वर्षांमध्ये सलमानने यशाचे शिखर गाठले आहे. मात्र, तो इथपर्यंत कसा पोहोचला, त्याच्या यशाचे गमक काय आहे, याबद्दल त्याने भाष्य केले. यादरम्यान तो स्वत:ला भाग्यवानही समजतो. मात्र, यावेळी त्याने हेही मान्य केले की, तो त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला विचार करायचा की, त्याचे जवळचे मित्र त्याला मोठा माणूस बनवतील, पण असे काहीच घडले नाही. त्याला सहजरीत्या बदलले गेले आणि सिनेमांतून बाहेर काढले. आता 34 वर्षांनी सलमानने याबाबत मोकळेपणाने भाष्य केले.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सलमान खान (Salman Khan) याने खुलासा केला की, त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) त्यांच्या काळात खूपच शानदार काम करत होते आणि कुटुंबाला वाटले की, हे कायम असेच राहील. मात्र, एक काळ असा आला की, त्यांच्याकडे आता 5 वर्षांपर्यंत काहीच काम नव्हते. त्यानंतर त्यालाही असे वाटले की, त्याचे मित्र त्याला मोठा माणूस बनवतील, पण तो चुकीचा ठरला. कारण, सहजरीत्या त्याला सिनेमांमध्ये बदलले गेले आणि बाहेर काढले गेले. त्यानंतर त्याला जाणवले की, जर सिनेमात सर्वोत्तम द्यायचे असेल, तर त्याला स्वत:वर काम करण्याची गरज आहे.

मेहनत करण्यामध्ये ठेवतो विश्वास
सलमाननुसार, यशाचे गमक हे आहे की, जर कुणी यशस्वी झाले, तर ती त्याची कठोर मेहनत आहे. जर कुणी यशस्वी झाले नाही, तरीदेखील त्याला कठोर मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. कारण, घेतलेले कष्ट कधीच व्यर्थ जात नाही. या दरम्यान त्याने हेही स्वीकारले की, त्याचे नशीब चांगले होते. असे काही लोक आहेत, जे त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत. मात्र, त्यांच्यातील एक व्यक्ती आहेत, ज्यांचे नशीब चांगले आहे.

सलमान खानचे प्रोजेक्ट
सलमान खान हा शेवटचा ‘वेड’ या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. 2021मध्ये तो ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्याच्या खात्यात ‘किक 2’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (salman khan revealed his friends getting replaced and thrown out read here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘आईला जेव्हा वाटेल तेव्हा चापट मारु शकते’, असा का बाेलला सलमान खान? जाणून घ्याच
वर्षभरात चित्रपटांचा पाऊस पडला, पण ‘या’ सिनेमांवर बनवले गेले सर्वाधिक मीम्स; एक नजर टाकाच

हे देखील वाचा