मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला ( Shreyas Talpade) 14 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. या उपचारानंतर आता श्रेयसची प्रकृती स्थिर झाली आहे आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
श्रेयसची पत्नी दीप्तीने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने लिहिले की, “माझे जीवन, माझा श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे आणि घरी परतला आहे. ही भयंकर घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी देव माझ्याबरोबर होता. आता मी कधीच त्याच्या अस्तित्वावर शंका घेणार नाही की तो आहे की नाही.”
दीप्तीने पुढे लिहिले, “मी त्या दिवशी एका व्यक्तीकडे मदत मागितली आणि १० हात मदतीला आले. श्रेयस गाडीच्या आत पडलेला होता, पण ते लोक कोणाला मदत करत आहेत हे त्यांना माहीत नव्हतं, तरी ते मदतीला धावून आले. मुंबई हे असं एक शहर आहे, ज्याने इथं आम्हाला एकटं सोडलं नाही तर आमची काळजी घेतली. मी आमचे सर्व मित्र, कुटुंबातील सदस्य आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींचे आभार मानते. हे लोक आपलं काम सोडून आमच्या मदतीला आले होते.”
View this post on Instagram
दीप्तीने बेले व्ह्यू हॉस्पिटलच्या टीमचेही आभार मानले. तिने लिहिले, “मी बेले व्ह्यू हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी त्वरित उपचार करून माझ्या पतीला वाचवले. सर्व डॉक्टर, परिचारिका, भाऊ, मुलं, मावशी, प्रशासन आणि सुरक्षा टीम तुमचं काम पैशांत मोजता येऊ शकता नाही.” श्रेयसच्या डिस्चार्जच्या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्रेयस तळपदेने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. (After Shreyas Talpade was discharged Deepti thanked those who helped her her post in discussion)
आधिक वाचा-
–‘मिल्क’ नावाने प्रसिद्ध असलेली तमन्ना बनली बॉक्सर, ‘हे’ चित्रपट ठरले सुपरफ्लॉप
–तमन्ना भाटियाला वयाच्या 13व्या वर्षापासूनच मिळू लागलेल्या ऑफर्स, पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरली अभिनेत्री