Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘खूप लवकर निघून गेला’, म्हणत सलमान खानने वाहिली सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली

‘खूप लवकर निघून गेला’, म्हणत सलमान खानने वाहिली सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली

‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच कलाकार आणि फॅन्सने त्याला श्रद्धांजली वाहण्यासोबतच त्याच्या आठवणींना उजाळा दिला. टेलिव्हिजनवरील कलाकार तर सोशल मीडियावर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत. सोबतच बॉलिवूडमधील कलाकार देखील सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे.

यात भाईजान सलमान खानने देखील सोशल मीडियावर सिद्धार्थच्या जाण्याचा शोक व्यक्त केला आहे. सलमानने ट्विट करून सिद्धार्थसारख्या तरुण अभिनेत्याच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे. सलमानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “सिद्धार्थ शुक्ला खूप लवकर निघून गेला. तू नेहमी आठवणीत राहशील.” बिग बॉस १३ च्या दरम्यान सलमान आणि सिद्धार्थची चांगली मैत्री झाली होती. या शोदरम्यान सलमानने त्याचे कौतुक केले, त्याला ओरडला, समजून सांगितले यातूनच त्यांची मैत्री घट्ट होत गेली.

सिद्धार्थ शुक्लाने २००८ मध्ये त्याच्या करियरची सुरुवात केली. टीव्ही मालिकांमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. यादरम्यान त्याने सलमान खानने होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस १३’मध्ये सहभागी झाला. या शोमुळे सिद्धार्थ शुक्लाची सर्वत्र चर्चा झाली. शो दरम्यान, सलमान खान सिद्धार्थ शुक्लावर खूप प्रभावित झाला. एकदा शो दरम्यान, सलमान खान सर्व स्पर्धकांसमोर म्हणाला की, ‘सिद्धार्थ शुक्लाला प्रचंड मते मिळत आहेत.’ जसे काही सिद्धार्थ शुक्ला शो चालवत आहे.

बिग बॉस १३ च्या दरम्यान सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी प्रसिद्धीच्या झोतात आली. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतरही दोघांची जोडी ट्रेंडमध्ये होती. दोघे मिळून काही प्रोजेक्टवर काम करणार होते. बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो की, एकदा सलमान खान बिग बॉसमध्ये ‘वीकेंड का वार’च्या निमित्ताने येऊ शकला नाही. म्हणून निर्मात्यांनी सिद्धार्थ शुक्लाला बोलावले होते.

‘बिग बॉस सीझन १३’मध्ये सिद्धार्थ शोमधील सर्वात मोठा अकर्षण होता. सिद्धार्थ शुक्लाला शोमध्ये सलमान खानने अनेक वेळा फटकारले होते. सलमान खानने सिद्धार्थच्या स्वभावाच्या समस्यांबाबत सिद्धार्थला अनेक वेळा सल्लाही दिला होता. एकदा सलमानने सिद्धार्थला रागावर नियंत्रण ठेवण्याच्या टिप्सही दिल्या होत्या. सलमान सिद्धार्थसोबत एका खास बाँड शोमध्ये दिसला होता. कधी सलमान त्याला टोमणे मारायचा तर कधी तो विनोद करायचा.

सिद्धार्थ शुक्लाच्या बिग बॉसच्या प्रवासादरम्यान त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. अशा परिस्थितीत होस्ट सलमान खान देखील सिद्धार्थच्या समर्थनासाठी अनेक वेळा दिसला. म्हणूनच सलमान सोशल मीडियावर ट्रोल झाला की, तो सिद्धार्थ शुक्लाची बाजू घेतो. हा शो सिद्धार्थबाबत पक्षपाती असल्याचेही म्हटले होते. शोच्या स्पर्धकांनीही यावर विश्वास ठेवला होता. गोष्टी कितीही बदलल्या तरी, हे देखील खरे आहे की, सीझन १३ ला सुपर डुपर हिट बनवण्याचे सर्व श्रेय सिद्धार्थ शुक्लाला जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

-बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा