पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला(Sidhu Moosewala) यांच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला करण्यात आला. या हल्लात सिद्धू मुसेवाला यांचे निधन झाले. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या धक्क्यातून चाहते अजून सावरले नसताना आता पंजाबी इंडस्ट्रीतून आणखी एका पंजाबी गायकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या गायकाचं नाव अल्फाज असे आहे. धक्का बसला आहे.
हनी सिंगने शेअर केली पोस्ट
पंजाबी गायक अल्फाजचा रुग्ण्यालयातील फोटो शेअर करुन प्रसिद्ध रॅपर हनी सिंग(Honey Singh) यांने त्याच्या चाहत्यांना अल्फाजच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे सांगितले आहे. हनी सिंहनं लिहिलं की, ‘काल रात्री अल्फाज या माझ्या भावावर कोणी तरी हल्ला केला. ज्याने हा हल्ला केला, त्याला मी सोडणार नाही. कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा. ‘हनी सिंहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन अल्फाजच्या हेल्थबाबत अपडेट दिली. त्याने पोस्ट शेअर करत लिहिलं,’अल्फाजच्या प्रकृतीबाबत जाणून घेण्यासाठी मी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली. तो सध्या आयसीईयूमध्ये आहे.’ चांगली गोष्ट म्हणजे अल्फासचा हल्लेखोर पकडला गेला आहे.
मोहाली पोलिसांचे आभार मानले
यानंतर हनी सिंगने त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मोहाली पोलिसांचे आभार मानले आहेत. अल्फास आता धोक्याबाहेर असल्याची माहितीही देण्यात आली आहे. पोस्ट शेअर करताना हनी सिंगने लिहिले की, ‘मोहाली पोलिसांचे विशेष आभार, ज्यांनी हल्लेखोरांना पकडले. हल्लेखोरांनी काल रात्री टेम्पो ट्रॅव्हलरने अल्फाजवर हल्ला केला होता. तसेच हनी सिंगने लिहिले आहे की, ‘अल्फाझ आता धोक्याबाहेर आहे.’

View this post on Instagram
अल्फाजने 2500 पेक्षा जास्त गाणी लिहिली
अल्फाज हा हनी सिंहचा जवळचा मित्र आहे. त्यानं वयाच्या 14 व्या वर्षी गाणं लिहायला सुरुवात केली. अल्फाजनं 12 वीमध्ये असताना कॉल सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या दरम्यान तो गाणी देखील गायचा. अल्फाजनं 2500 पेक्षा जास्त गाणी लिहिली आहे. त्याच्या 2011 साली रिलीज झालेल्या हाय मेरा दिल या गाण्यानं प्रेक्षकांची पसंती मिळवली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिहारमधील अश्लिलता बंद करण्यासाठी अक्षरा सिंगणे ‘चौसठ जोगीनिया माई’च्या रुपात धारण केले रौद्र रूप
लग्नाच्या चार दिवसांनंतरच ढसाढसा रडलेली ‘ही’ अभिनेत्री, धक्कादायक होतं कारण