Tuesday, May 28, 2024

हृदयद्रावक! सिद्धू मुसेवालानंतर पंजाबी इंडस्ट्रीला आणखी एक धक्का, प्रसिद्ध गायकाचे निधन

कलाविश्वातून एकापाठोपाठ एक अशी हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. आधी गायक सिद्धू मूसेवाला याने जगाचा निरोप घेतला होता. आता त्याच्यानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक बलविंदर सफरी यांना देवाज्ञा झाली आहे. मंगळवारी (दि. २६ जुलै) त्यांचे निधन झाले. ते अवघे ६३ वर्षांचे होते. ते मागील काही काळापासून आजारी होते. त्यांना आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी ८६ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे कलाविश्व शोकसागरात आहे.

हृदयविकाराचा झटका
गायक बलविंदर सफरी (Balwinder Safri) यांना हृदयाशी संबंधित आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ट्रिपल बायपाससाठी पाठवले जाणार होते. शस्त्रक्रिया पूर्ण झाली, पण नंतर त्यामध्ये काही समस्या निर्माण झाली. त्यामुळे ते कोमात गेले. त्यांच्या सीटी स्कॅनमध्ये मेंदूला नुकसान झाल्याचे समोर आले. बलविंदर यांच्या निधनानंतर (Balwinder Safri Death) कलाकार आणि चाहते सोशल मीडियावरून शोक व्यक्त करत आहेत.

कलाकारांनी व्यक्त केला शोक
चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. यामध्ये नीरू बाजवा, गुरदास मान, जस्सी गिल, गुरू रंधावा आणि दिलजीत दोसांझ यांचाही समावेश आहे. गुरु रंधावा याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने लिहिले आहे की, “सर आम्ही तुमचे संगीत आणि पंजाबी संगीतातील योगदानाला सलाम ठोकतो. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. अलविदा सर बलविंदर सफरी.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

तसेच दिलजीतने त्याच्या ट्वीटमध्ये “वाहेगुरू, बलविंदर सफरी जी,” असे लिहीत हात जोडणारे इमोजी वापरले आहेत.

जस्सी गिल याने त्याच्या स्टोरीमध्ये त्यांना टॅग करत म्हटले की, “तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल.” तसेच, गुरदास मान हा त्यांना सफरी साहब म्हणायचा. पुन्हा एकदा प्रेमाणे “सफरी साब” असे लिहीत तो भावूक झाला आहे.

बलविंदर यांची गाणी
बलविंदर सफरी यांना भांगडा स्टारदेखील म्हटले जात होते. त्यांची ‘बोलियां’, ‘बोली बोली’, ‘इक दिल करे आज भी’ ही गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर रुळताना दिसतात. शेतात गेलेला शेतकरी आजही त्याच्या ट्रॅक्टरवर बलविंदर यांची गाणी वाजवताना दिसतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
तब्बल आठ वर्षांनी ‘चला हवा येऊ द्या’ टीमसाठी मिळाली आनंदाची बातमी, श्रेया बुगडेने केला खुलासा
रणवीर सिंगचा पाय आणखी खोलात! मनसेकडून गुन्हा दाखल, फोटो तात्काळ हटवण्याचा दिला इशारा
शेवटी सापडला! रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचा पहिला खुलासा, म्हणाला ‘तो २ तास उघडाच…’

हे देखील वाचा