सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास करताना तपास यंत्रणांनी अनेक खुलासे केले. त्यातील एका ड्रग्स रॅकेट प्रकरणात बॉलीवूड मधील अनेक मोठे कलाकार अडकले. दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, भारतीसिंग, राकुलप्रीत, रिया चक्रवर्ती आदी कलाकारांचा या यादीत समावेश होता. या कलाकारांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. या ड्रग प्रकरणामुळे या मोठ्या कलाकारांच्या ब्रँड वैल्यू वर खूप मोठा परिणाम झाला आहे.
आजच्या घडीला सर्वात जास्त ब्रँड वैल्यू दीपिका पदुकोणची आहे. दीपिका फक्त जाहिराती करून वर्षाला १२० ते १५० करोड रुपये कमावते. दिपीकाकडे सध्या लॉरियल, विस्तारा एयरलाइन, ऍक्सिस बँक, मेड-लाइफ, एपिगामिया योगर्ट, केलोग्स, ओप्पो, ब्रिटानिया सारख्या अनेक मोठ्या जाहिरातींचे ब्रॅण्ड्स आहेत.
श्रद्धा कपूरकडे देखील आजच्या काळात मोठ्या जाहिराती आहेत. ती वर्षाला २० ते ५० करोड जाहिरातींच्या माध्यमातून कमवत असते. द बॉडी शॉप, वोग आई-वियर, लेक्मे, वीट, लिप्टन ग्रीन टी यांसारख्या अनेक जाहिरातींमधून श्रद्धा करोडो रुपये कमावते.
सध्याच्या तरुणाईची आवडती आणि आघाडीची नायिका म्हणजे सारा अली खान. साराची देखील दिवसागणिक ब्रँड वैल्यू वाढत आहे. सध्या साराला जाहिरातींमधून १० ते २० करोड रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तिच्याकडे वीवो, फेंटा, गार्नियर इंडिया, पूमा, मेबिलीन सारख्या जाहिराती आहेत.
सर्वांची आवडती कॉमेडियन भारती सिंग देखील जाहिरातीमधून वर्षाला जवळपास २ करोड रुपये कमावते. भारतीची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. भारती सुमारे १८ ब्रँडच्या जाहिराती करत आहे.
कलाकारांच्या लोकप्रियतेवर त्याची ब्रँड वैल्यू ठरत असते. जेव्हा एखाद्या कलाकारावर असे आरोप होतात तेव्हा त्याची लोकप्रियता आणि पर्यायाने ब्रँड वैल्यू कमी होते. याचा परिणाम उत्पादनांवर होतो.
आताच्या या परिस्थिती जाहिरात करणाऱ्या कंपन्या कलाकारांवर झालेले आरोप सिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या सर्व मोठ्या कलाकारांवर झालेल्या आरोपांमुळे जाहिरात करणाऱ्या कंपन्यांनाइ b आधीच मोठा झटका बसला आहे. कलाकारांसोबत असलेला उत्पादनाच्या जाहिरातींचा करार रद्द करण्यापूर्वी कंपन्या आरोप सिद्ध होण्याची वाट बघत आहे. एका मात्र नक्की कलाकारांच्या या प्रकरणामुळे त्यांचे जुने करार पुन्हा नवीन करताना कंपन्या पुन्हा एकदा नक्कीच विचार करतील. या प्रकरणामुळे आता नवीन कंपन्या या कलाकारांना किती जाहिराती देताना पुन्हा एकदा विचार करतील हे नक्की.
सीनियर मार्केटिंग कन्सल्टंट दीपेश शहा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ब्रांड एंडोर्समेंट म्हणजे फक्त एका मार्केटिंग एक्टिवटी नसून ती एका लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट आणि पार्टनरशिप आहे. कलाकारांच्या निगेटिव्ह पीआर मुळे त्याच्या एंडोर्समेंटवर याचा परिणाम नक्कीच होईल मात्र हा परिणाम जास्त काळासाठी नसेल. यासाठी त्यांनी मॅग्गी आणि कॅडबरी यांचे उदाहरण देत ते म्हणाले या दोन्ही गोष्टी आपण काही काळासाठी घेणे बंद केले होते. मात्र नंतर काही दिवसांनी आपण पुन्हा त्या घ्यायला लागलोच ना. तसेच काही अंशी कलाकारांच्या बाबतीत आहे. ते देखील एका चांगल्या चित्रपटामुळे प्रेक्षकांशी पुन्हा जोडले जातील.
अनेक विवादांमुळे सलमान खान, आमिर खान सारख्या कलाकारांना देखील नुकसान सहन करावे लागले.