Monday, July 1, 2024

रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीने ढसाढसा रडत लिहिली पोस्ट; म्हणाली, ‘काळीज…’

मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी (12 डिसेंबर ) निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अभिनेत्री हेमांगी कवी हिने रवींद्र बेर्डे (Rabindra Berde news) यांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रवींद्र बेर्डे (Rabindra Berde death) यांच्यासोबतच्या एका चित्रपटातील आठवणी सांगितल्या आहेत.

पोस्ट शेअर करताना हेमांगी कवीने (Hemangi Kavi post) लिहिले की, “रविंद्रदादा बेर्डे गेल्याची बातमी कळली आणि मी थेट कोल्हापुरात पोचले. 2008 साली ‘धुडगूस’ चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात केलं होतं. त्यात मी रविंद्रदादांच्या मुलीचं काम केलं. तोपर्यंत मी त्यांना विनोदी भुमिकांमध्ये पाहीलं होतं. पण धुडगूस मधला त्यांनी साकारलेला बाप, निव्वळ कमाल. हा प्रसंग माझा सर्वात आवडता आहे.

यातली बापाची हतबलता, चुकीच्या घरात मुलीचं लग्न लावून दिल्याचा पश्चाताप, आता आपण मुलीसाठी काहीच करू शकत नसल्याच्या जाणिवेने कासावीस झालेला चेहरा हे सग्गळं काहीही न बोलता अगदी मोजक्या expressions मध्ये दाखवणं खुप कठीन असतं जे त्यांनी सहजगत्या केलं होतं. मला आठवतंय हे सगळं one take मध्ये झालं होतं. जो नट इतकी वर्ष हसवत आला त्याला असं रडताना पाहून काळीज पिळवटून निघतं! माझं तरी निघतं!
ज्यांना लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो त्यांच्याबरोबर screen share करायला मिळणं खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी! तुमची खूप खूप आठवण येत आहे.” तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर मराठी कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.

हेमांगी कवीच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशीने लक्षवेधी कमेंट केली आहे. तिने कमेंट करताना लिहिले की, “हेमांगी, तुझ्या आतापर्यंतच्या कामातील सर्वोत्तम काम. रवींद्र काकांबरोबर काम केल्याचा आशीर्वाद तुला मिळाला.” स्पृहाच्या या पोस्टवर हेमांगीने धन्यवाद असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

 हेमांगी कवीच्या कामाविषयी बोलाचं झालं तर, हेमांगी कवीने वादळवाट, अवघाचि संसार, मिसेस मुख्यमंत्री, फू बाई फू, फुलपाखरू, मन धागा धागा जोडते नवा यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तसेच तिने पांडू या चित्रपटात काम केले आहे. (After the death of Ravindra Berden Marathi actress Hemangi Kavi wrote a post crying profusely)

आधिक वाचा-
Sankarshan Karhade: ‘मिसळ खाल्ली अन्..…’, संकर्षणची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकरी म्हणाले, ‘भुतासारखा माणुस…’
‘…तर मला वाटतं मी अभिनयाचं दुकानच बंद केलं पाहिजे’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच खळबळजनक भाष्य

हे देखील वाचा