Thursday, March 30, 2023

अभिनेत्री हेमांगी कवी पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘हे माझं पहिलं व्हॅलेंटाईन… ,’

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला गेला. या दिवशी कलाकारांनी आपल्या पार्टनरसोबत फोटो शेअर करत ‘व्हॅलेंटाईन डेच्या’ शुभेच्छा दिल्या. तर काही कलाकारांनी त्यांच्या व्हॅलेंटाईन डे च्या जुन्या आठवणी शेअर केल्या. मराठीतील आघाडीची अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिने नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘व्हॅलेंटाईन डेचे (valentine day) निमित्त साधून कोणी लग्न बांध गाठली तर, कोणी त्यांचे प्रेम व्यक्त करत खास पोस्ट,  फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्री हेमांगी कवीनेही (Marathi Actress Hemangi Kavi) ‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त साधत हेमांगीने पहिलं गिफ्ट काय मिळाले याचा रंजक किस्सा सांगितला आहे. या खास पोस्ट मध्ये तिने हातात रिंग असल्याचा फोटो शेअर केला. या पोस्ट मध्ये तिने असं लिहिले आहे की, “हे माझं पहीलं व्हॅलेंटाईन गिफ्ट . 14 फेब्रुवारी 2007! मुलुंडच्या पिझ्झा हटमध्ये साजरा केला होता पहीला वहीला व्हॅलेंटाईन डे. आयुष्यात पहील्यांदा पिझ्झा खाल्ला होता… नाही…त्याने खाऊ घातला होता.”

पुढे ती म्हणते की, ”हीच माझी त्यादिवशीची ‘प्रपोज रिंग’ होती आणि पुढे जाऊन हीच ‘साखरपुड्याची अंगठी’ माझी ही झाली. खरंतर प्रपोज तर करून झालं होतं. मी हो ही म्हणून झालं होतं. पण लग्नाच्या आधी साखरपुडा करायचाच असतो, म्हणून लग्नाच्या काही तासांपुर्वी साखरपुड्याचे कपडे घालून एकमेकांना अंगठी घालण्याची विधीपुर्वक औपचारिक्ता पार पाडली. पण साखरपुड्याची अंगठी म्हणून मी हीच घालणार हे आधीच सांगितलं होतं. कशाला हवी उगाच दुसरी अंगठी!
तेव्हा बोटात असलेली तीच अंगठी काढून एका नव्या भावनेने माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या बोटात घातली. मी त्याला त्याच्यासाठी बनवलेली अंगठी घातली आणि झाला आमचा साखरपुडा! तेव्हापासून आजतागायत ही माझ्या बोटात आहे. आम्ही एकमेकांना उगाचच काहीही गिफ्ट करत नाही कामाच्याच गोष्टी गिफ्ट करतो. दिवस ही साजरा होतो. गरज ही भागते आणि आठवण ही राहते. आजही आम्ही असच काहीतरी खरेदी करणार आहोत. तुम्हीही करा! आमच्याकडून तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा! प्रेम दिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा!”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

 

अशा प्रकारे हेमांगीने (Hemangi Kavi) आपलय जुन्या आठवणींना उजाळा देत तिच्या नवऱ्यावरच प्रेम व्यक्त करत खास पोस्ट शेअर केली. त्याचप्रमाणे ती अनेकदा आगामी प्रोजेक्ट, चित्रपट, करिअर व खासगी आयुष्याबाबत व्यक्त होताना दिसते. याशिवाय ती समाजातील प्रश्नांवर नेहमीच तिचे परखड मत मांडत असते. (marathi-actress-hemangi-kavi-share-post-on-social-media-first-valentine-day-memories)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सावळ्या रंगामुळे ‘या’ अभिनेत्रीला मिळाले नाही २८ वर्ष काम, आता बायोपिक मधून करणार कमबॅक
विराट आणि जडेजाचा भन्नाट डान्स पाहून बॉलिवूड किंग म्हणाला…,

हे देखील वाचा