Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारानंतर, गौहर खानची कलाकारांवर ‘आगपाखड’; ‘या’ कारणामुळे तापलीय अभिनेत्री

सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारानंतर, गौहर खानची कलाकारांवर ‘आगपाखड’; ‘या’ कारणामुळे तापलीय अभिनेत्री

सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारानंतर त्याची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री गौहर खानने अनेकांवर निशाणा साधला आहे. खरं तर, गौहरने त्या कलाकारांवर आणि लोकांवर राग व्यक्त केला आहे, जे सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांना मुलाखत देत होते.

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, गौहर खान त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्यानंतर तिने कोणाचेही नाव न घेता, तिच्या ट्विटर अकाऊंटवर अनेक कलाकारांवर आपला राग व्यक्त केला आहे. (after the funeral of sidharth shukla gauahar khan got angry on the celebs)

गौहरने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, “शोकात असलेल्या कुटुंबाला भेटल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीने त्याचा तपशील नाही द्यायला पाहिजे. जेव्हा लोक मुलाखत देतात किंवा त्या कुटुंबाबद्दल तपशील देतात, तेव्हा हे पाहून खरोखर वाईट वाटते. कृपया हे थांबवा! जर तुम्ही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गेला असाल, तर बाहेर येऊन खबरी बनू नका.”

यापूर्वीही, गौहरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील याबद्दल राग व्यक्त केला आहे. तिने अनेक टीव्ही आणि बॉलिवूड कलाकारांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. कसे लोक सिद्धार्थच्या घरासमोर कॅमेऱ्यासाठी पोझ देत होते, हे तिने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सांगितले होते. गौहरने असेही लिहिले की, हे सर्व पाहून तिला खूप वाईट वाटले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा