Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड टीझरनंतर समोर आले शाहरुख खानच्या चित्रपटाचे पोस्टर, निराळ्या अंदाजात दिसला अभिनेता

टीझरनंतर समोर आले शाहरुख खानच्या चित्रपटाचे पोस्टर, निराळ्या अंदाजात दिसला अभिनेता

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. अशातच आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ झाले आहे. तो एका डोळ्याने कॅमेऱ्याकडे पाहत आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख खान एका वेगळ्यात स्टाईलमध्ये दिसत आहे. तर त्याच्या हातांना पट्ट्यांने बांधले आहे आणि तो एका डोळ्याने कॅमेराकडे पाहत आहे.

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत शाहरुख खानने लिहिले की, “हे खूप खास आहे. यामागचे कारण म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत होत्या. त्यामुळे वाट पाहावी लागली. पण काही चांगल्या लोकांनी यावर खूप मेहनत घेतली आणि याला बनवले आहे. गौरव वर्मा आणि ऍटली यांनी ‘जवान’ बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही चलण्यासाठी तयार आहोत चीफ.” शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सहा भाषांमध्ये बनत आहे. (after the teaser the poster of shahrukh khan starrer film jawan is released)

शाहरुख खानने काही वेळापूर्वी इंस्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले होते, ज्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. तर त्यावर हजारो कमेंट्स आल्या आहेत. शाहरुख खान या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan) करत आहे.

दरम्यान आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही (Suhana Khan) लवकरच ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप उत्सुक आहे. दुसरीकडे शाहरुख त्याच्या मुलामुळेही खूप चर्चेत होता. अं’मली पदार्थांची पार्टी केल्याच्या आरोपावरून एनसीबीने त्याला पकडले होते. मात्र आता आरोपपत्रातून आर्यन खानचे (Aryan Khan) नाव हटवण्यात आले आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा