सध्या शाहरुख खान कमालीच्या फॉर्ममध्ये आला आहे. एकामागोमाग एक अशा चित्रपटांच्या घोषणेचा सपाटाच त्याने लावला आहे. २०१८ साली आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ सिनेमानंतर शाहरुख खान चित्रपटांपासून काहीसा लांब गेला. लवकरच तो ‘पठाण’ या सिनेमात दिसणार असून सध्या या सिनेमाचे शूटिंग चालू आहे. तर दुसरीकडे शाहरुखने नुकतीच त्याच्या अजून एका नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. तो लवकरच ‘जवान’ या सिनेमात दिसणार असून, नुकताच या सिनेमाचा पहिला लूक रिव्हिल करण्यात आला आहे. निर्मात्यांनी शाहरुख खानच्या लूकच झलक या व्हिडिओ टीझरमधून प्रेक्षकांना दाखवली आहे. शाहरुख खानचा लूक खूपच वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा असून हा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षक आतुर झाले आहेत.
या व्हिडिओ टीझरमध्ये चेहऱ्यावर पट्टी बांधून बंदुकांसोबत खेळणारा शाहरुख अनेक प्रश्न निर्माण करत आहे. नक्की चित्रपटाची कथा काय असणार याबाबत आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हा टिझर खूपच प्रभावी आणि दमदार असून, सर्वांनाच टिझर पाहून नक्कीच शाहरुख काहीतरी धमाकेदार त्याच्या फॅन्ससाठी आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या टीझरसोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
शाहरुख खानचा हा दमदार ऍक्शन सिनेमा बरोबर एक वर्षाने अर्थात २ जून २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. हिंदीसोबतच ‘जवान’ तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही रिलीज केला जाणार आहे. या बातमीमुळे दक्षिण भरातील शाहरुखचे फॅन्स नक्कीच सुखावले असतील यात शंका नाही. या सिनेमामध्ये दाक्षिणात्य यशस्वी अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शक एटली असून त्यांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
येत्या जानेवारीमध्ये शाहरुखचा ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित होणार असून, यात तो दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. याशिवाय तो राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’मध्ये तापसी पन्नूसोबत झळकेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा