टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थाने राज्य असते ते मालिकांचे. टीव्ही जगतात रोज नवनवीन विषयांवर मालिका सुरु होतात आणि बंद होतात. आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये संपूर्ण देशातील इंडस्ट्रीचा समावेश होतो. हे क्षेत्र कोणत्याही एका प्रदेशापुरते मर्यादित नसते. कधी कधी तर चित्रपटांपेक्षा अधिक टीव्ही क्षेत्र किंवा मालिकाच जास्त गाजताना दिसतात. मालिका ह्या अनेकांना रटाळवाण्या वाटत असतात. तेच तेच विषय वेगवेगळ्या पद्धतीने दाखवून एका पॉइंटला सर्व मालिका एकाच ठिकाणी येऊन थांबतात. आजकाल आपण ऐकत असतो की, पूर्वीच्या मलिकंच चांगल्या असायच्या मात्र असे असूनही, मालिकांचा प्रेक्षक आणि त्यांची लोकप्रियता काही कमी झाली नाही. अनेकदा आपण बघतो की, एका भाषेत एखादी मालिका जर गाजली तर लगेचच ती दुसऱ्या भाषेत रिमेक बनवली जाते. बहुतकरून आपल्याला हिंदी आणि मराठी मालिकांबद्दल हे समजते, मात्र दाक्षिणात्य मधील अनेक भाषांचे किंवा आपल्याकडील मलिकचे दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक बनवले जातात.
आता लवकरच झी मराठीवरील सर्वात जास्त गाजलेल्या अजून एका मालिकेचा दाक्षिणात्य भाषेत रिमेक केला जाणार आहे. तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेली ‘अग्गंबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) या लोकप्रिय मालिकेचा लवकरच ‘कन्नड’ भाषेत रिमेक होणार आहे. निवेदिता सराफ, डॉ. गिरिश ओक यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत विधवा सासूची सून मैत्रीण होऊन सासूला पुन्हा एकदा नव्याने जगायला शिकवते आणि तिला काळाच्या प्रवाहात सोबत घेऊन चालवते. या मालिकेने मराठीमध्ये लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड मोडत नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले. याआधी या मालिकेचे तामिळ आणि मल्याळम भाषेतदेखील रिमेक झाले आहेत.
या मालिकेची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका संपल्यानंतर ‘अग्गंबाई सूनबाई’ हा याच मालिकेचा पुढचा भाग देखील काढला होता. मराठीमध्ये कोणत्याही मालिकेचा असा भाग निघणे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल. ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेप्रमाणेच ‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या भागाचा देखील लवकरच कन्नड भाषेत रिमेक होणार आहे.
याआधी ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘रंग माझा वेगळा’, ‘आई कुठे काय करते’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘तुला पाहते रे’, ‘जीव झाला येडापीसा’ आदी अनेक मराठी मालिकांचे हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये रिमेक झाले आहेत.
हेही वाचा-