Monday, July 1, 2024

अहान शेट्टीने केले गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबतचे व्हॅकेशन फोटो शेअर, अर्जुन कपूरने केली हटके कमेंट

सोशल मीडियावर नजर टाकली, तर सगळीकडे फक्त आणि फक्त स्टार्स किड्सचाच बोलबाला दिसत आहे. सोशल मीडिया पोस्टच्या बाबतीत म्हणा नाही, तर मीडियामधील बातम्यांच्या बाबतीत. स्टारकिड्स सगळीकडेच चांगलेच गाजत आहेत. या स्टारकिड्सच्या गर्दीमध्ये अजून एक नाव आले आहे, आणि ते नाव म्हणजे अहान शेट्टी. बॉलिवूडच्या अण्णाचा म्हणजेच सुनील शेट्टीचा मुलगा असलेला अहान जरी अजून चित्रपटांमध्ये आलेला नसला, तरीही त्याची लोकप्रियता तुफान आहे.

अहान शेट्टीला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असून, तो सोशल मीडियावर भरपूर सक्रिय देखील आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच त्याला तुफान लोकप्रियता मिळत आहे. त्याला प्रसिद्धी मिळण्याचे कारण म्हणजे अहानचे वैयक्तिक आयुष्य. अहानने नुकतेच त्याचं गर्लफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमुळे अहान चांगलाच लाईमलाईट्मधे आला आहे. अहान आणि त्याचे रिलेशन याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. (ahan shetty shares vacation photo with girlfriend tania shroff)

सध्या अहान त्याच्या गर्लफ्रेंडसोबत तानिया श्रॉफसोबत सुट्ट्यांसाठी गेला आहे. अहान बीच असलेल्या ठिकाणी त्याचे व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. याच सुट्ट्यांचे काही फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आणि मित्रांसोबत मजा मस्ती करताना दिसत आहे.

अहानने शेअर केलेल्या चार फोटोंपैकी एका फोटोमध्ये तो तानियासोबत पाण्यात दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो आणि तानिया खुर्चीवर बसले आहेत. हे फोटो पोस्ट करताना अहानने उन्हाळ्याला अलविदा म्हटले आहे. हे फोटो पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये “Goodbye summer,” असे लिहिले आहे. आता इंटरनेटवर अहान आणि तानियाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

त्याच्या या फोटोंवर अभिनेता अर्जुन कपूरने कमेंट करत “Globe Trotter,” असे लिहिले आहे. याचा अर्थ आहे, देशोदेशी वारंवार प्रवास करणारा प्रवासी.

अहान शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो लवकरच ‘तडप’ सिनेमातून चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. हा सिनेमा तेलुगूमधील हिट चित्रपट ‘आरएक्श 100’ चा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटात अहानसोबत मुख्य भूमिकेत तारा सुतारिया दिसणार असून, सिनेमा याचवर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा