Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड कोण आहे हा गोंडस चिमुकला, ज्याने ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये साकारलीय आमिर खानच्या बालपणीची भूमिका?

कोण आहे हा गोंडस चिमुकला, ज्याने ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये साकारलीय आमिर खानच्या बालपणीची भूमिका?

हिंदी चित्रपटसृष्टीतील परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर रविवारी (२९ मे) रिलीझ झाला आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पण ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर जर कोणी सर्वाधिक चर्चेत असेल, तर तो या चित्रपटात आमिरच्या बालपणाची भूमिका करणारा बालकलाकार अहमद इब्न उमर (Ahmed Ibn Umar) आहे.

सोशल मीडियावर रंगलीय या छोट्या उस्तादाची चर्चा
‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर रिलीझ होऊन २४ तासही पूर्ण झालेले नाहीत आणि हा ट्रेलर यूट्यूबवर ३० दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. तसेच, ‘लाल सिंग चड्ढा’चा हा अधिकृत ट्रेलर ट्रेडिंगमध्ये देखील आहे. या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या छोट्या आमिरची भूमिका साकारणाऱ्या अहमद इब्न उमरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुंदर चेहरा आणि सुंदर डोळे असलेल्या अहमदने या चित्रपटात एका अपंग मुलाची भूमिका साकारली आहे. अहमद इब्न उमर हा जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरचा आहे. अहमदने वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी मोठ्या पडद्यावर आमिर खानची भूमिका साकारण्याचे आव्हान पेलले आहे. (ahmed ibn umar played young role of aamir khan in laal singh chaddha film)

इथे पाहा ट्रेलर

‘लाल सिंग चड्ढा’ आधी ‘या’ चित्रपटात केलंय काम
अहमद इब्न उमरची बॉलिवूड चित्रपटात काम करायची ही पहिलीच वेळ नाही. २०१९च्या सुरुवातीला, उमरने सलमान खान (Salman Khan) निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटात आपली क्षमता सिद्ध केली आहे. ‘नोटबुक’ या चित्रपटात त्याने मोठ्या पडद्यावर युवा कॅप्टन कबीर कौलची भूमिका साकारली होती. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात अहमद इब्न उमर एका छोट्या सरदाराच्या भूमिकेत खूप छान दिसत आहे.

अशा परिस्थितीत, चाहते आमिरच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आमिरचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा