Thursday, March 28, 2024

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर आउट, क्रिकेटच्या मैदानावर दिसला अभिनेत्याच्या अभिनयाचा जलवा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी अखेर चित्रपटाच्या उत्सुक प्रेक्षकांसाठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. अहमदाबाद येथे रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान आमिर खान आणि करीना कपूर (Kareena Kapoor) स्टारर चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

समोर आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आमिर खान लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा वेगळा असलेल्या मुलाच्या भूमिकेत दिसला. परंतु त्याची आई त्याला नेहमीच प्रोत्साहन देताना आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करताना दिसते. त्याचवेळी रूपाच्या भूमिकेत करीना कपूरही एका वेगळ्याच रूपात दिसली. (aamir khan starrer film laal singh chaddha movie trailer out)

विशेष म्हणजे ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आणीबाणी, १९८३ क्रिकेट विश्वचषक, ऑपरेशन ब्लू स्टार, रथयात्रा आणि १९९९ कारगिल युद्ध इत्यादी भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यात येणार आहेत. हा चित्रपट ऑस्कर विजेत्या अमेरिकन ड्रामा ‘फॉरेस्ट गंप’चा (१९९४) रिमेक आहे.

अभिनेत्याने शनिवारी (२८ मे) व्हिडिओ शेअर करून माहिती दिली होती की, ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर आयपीएल २०२२ च्या फायनल दरम्यान लॉन्च केला जाईल. याशिवाय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री करीना कपूर हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून चित्रपटाच्या ट्रेलर रिलीझची माहिती दिली होती.

इथे पाहा ट्रेलर

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिर पुन्हा एकदा त्याच्या ‘३ इडियट्स’ सहकलाकार करीना कपूर खान आणि मोना सिंगसोबत (Mona Singh) दिसणार आहे. तसेच नागार्जुनचा (Nagarjuna) मुलगा नागा चैतन्य (Naga Chaitanya) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा